January 22, 2025

विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून १३६९ घरकुले मंजूर

गेवराई तालुक्याला पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिले झुकते माप

                   गेवराई दि.२९( वार्ताहार )

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जि. प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून गेवराई विधानसभा मतदार संघाला रमाई आवास योजनेअंतर्गत१३६९ घरकुले मंजूर झाले असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्याला सर्वाधिक घरकुले देऊन झुकते माप दिले आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ गोरगरीब लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी जि.प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षासाठी गेवराई तालुक्यातील लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडे पाठपुरावा केला होता. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नुकतेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुरले जाहिर केले असून गेवराई तालुक्याला १३६९ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी सर्वाधिक घरकुले मंजूर करुन गेवराई तालुक्याला झुकते माप दिले आहे

विजयसिंह पंडित यांनी यापूर्वी देखील ५४७ घरकुले मंजूर करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला होता. रमाई आवास योजनेअंतर्गत या वर्षासाठी १३६९ ही सर्वाधिक घरकुले मंजूर करून आणल्याबद्दल लाभार्थ्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *