गेवराई तालुक्यात गारपिटीने दिला तडाखा

गेवराई परीसरात झालेल्या पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान

                  गेवराई दि. 28 ( वार्ताहर )

तालुक्यातील विविध भागात मंगळवार ता. 28 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गारपीट झाली असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. दरम्यान, अवकाळी गारपीट झाल्याने उभ्या व कापून -काढून ठेवलेल्या तुरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी दिवसभर आभाळ भरून आले होते. ढगाळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झाली. उमापूर, राक्षसभुवन परिसरात गारांचा पाऊस झाला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे.गेल्या आठवडय़ापासून थंडी जाऊन पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेताततुरीचे पिक उभे आहे. काही ठिकणची खळेदळे झाली आहेत. ज्यांची तुर निघाले ते शेतकरी वाचले आहेत. काही शेतकर्‍यांनी तुरीची कापणी करून वाळू घालून ठेवल्यात. आठ दिवस झाले तरी तुरी वाळल्या नाहीत. उन पडत नाही. दिवसा ढगाळ वातावरण व रात्री उन्हाळा असल्या सारखे वातावरण होऊ लागले आहे.सरकारी यंत्रणेकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे, सगळीकडे चिंता व्यक्त केली जात होती. तुरी काढायच्या आधीच पावसाने गाठल्याने पंचायत झाली आहे. आधीच पावसाचे प्रमाण वाढल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. कापूस,तुरीला पाहिजे तेवढा उतारा आला नाही. खर्च कसातरी निघाला आहे. भाव चांगला आल्याने ते तरी बर झाल, अशा प्रतिक्रिया आल्यात. दरम्यान, मंगळवार ता. 28 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गारपीट झाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अवकाळी गारपीट झाल्याने उभ्या व कापून -काढून ठेवलेल्या तुरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *