येथील कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कलाविष्कार प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जानेवारीत नृत्याविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या गौरव सोहळ्यासह तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे यांनी दिली आहे.
गेल्या सात वर्षापासून राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जानेवारीत कलाविष्कार प्रतिष्ठानच्या वतीने नृत्याविष्कार महोत्सवाचे आयोजन केल्या जाते. दिनांक 21 डिसेंबर रोजी प्रतिष्ठानचे कार्यवाह दिनकर शिंदे यांच्या निवास्थानी झालेल्या सभासदांच्या बैठकीत, याही वर्षी जानेवारीत छत्रपती मल्टीस्टेट आणि गेवराई तालुका पत्रकार संघाच्या सहकार्याने गेवराई येथे तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेचे कलाविष्कार प्रतिष्ठानकडून आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी 7385394260 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. त्यासोबतच गेवराई भूषण पुरस्कारासह विविध क्षेत्रात आदर्शवत, उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा नवरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून, त्यांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे यांनी दिली आहे. वर्षभरात कलाविष्कारकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही यावेळी नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीस नारायण झेंडेकर, शिवप्रसाद आडाळे, एकनाथ लाड, गणेश मिटकर, गजानन चौकटे, सचिन पुणेकर, संतोष कोठेकर, प्रतिष्ठानच्या सचिव सौ आशा शिंदे, सौ सीता महासाहेब, सौ रोहिणी आडाळे, सौ प्रियांका पुणेकर, सौ रेणुका मिटकर, सौ माधुरी चौकटे, सौ ज्योती झेंडेकर, सौ स्वाती कोठेकर, सौ कविता लाड आदींसह कलाविष्कार प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...