अट्टल महाविद्यालयात तिसरे कोविड लसीकरण शिबिर संपन्न
गेवराई, दि 17 ( वार्ताहार )
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे तिसरे कोविड लसीकरण शिबिर संपन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महाविद्यालयीन स्तरावर शंभर टक्के कोविड लसीकरण करण्याच्या मोहिमेत महाविद्यालयातील तिसरे लसीकरण शिबिर घेण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथील आरोग्य कर्मचारी डॉ. मिसाळ, डॉ. आंधळे, श्रीमती वसावे, श्रीमती गर्जे आणि सहकारी शिक्षक मंडळींनी या शिबिरात सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील 18 वर्षे वयावरील संपूर्ण विद्यार्थ्यांचे तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करण्यास महाविद्यालय यशस्वी झाले आहे.
नियमित तासिका आणि परीक्षांच्या पार्श्वभूमीवर हे लसीकरण विद्यार्थ्यांसाठी बंधन कारक होते. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्या माध्यमातून हे शिबिर राबविण्यात आले. या शिबिरासाठी उपप्राचार्य डॉ. मेजर विजय सांगळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. समाधान इंगळे, प्रशासकीय कर्मचारी किसन सागडे यांनी परिश्रम घेतले. त्यासोबतच डॉ. सुदर्शना बढे, प्रा. रेवणनाथ काळे, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक यांनी पुढाकार घेऊन लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून शिबिर यशस्वी केले.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...