एकाच बाजार तळावर अधिकृत बाजार सुरू झाल्याने गेवराईतील शेतकऱ्यांसह ग्राहकांचाही होतोय फायदा
मोंढा चौकातील बाजार न प ने तात्काळ बंद करावा – दिनकर शिंदे
गेवराई दि 17 ( वार्ताहार )
गेवराई शहरातील चार ठिकाणी अनधिकृत बाजार भरत असल्याने शेतकरी व ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. सदर बाजार अधिकृतपणे एकाच आठवडी बाजाराच्या जागेवर भरवावा अशी मागणी शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे यांनी केली होती. अखेर बुधवारचा आठवडी बाजार अधिकृत बाजार तलावरच सुरू झाल्याने शेतकरी व ग्राहकांना याचा फायदा होवू लागला आहे. मात्र चौकातील रस्त्यावर काही भाजीपाला विक्रेते व्यापारी बसत असल्याने, रहदारीला अडथळा तर होतोच परंतु या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तो बाजार नगर परिषदेने तात्काळ बंद करून शेतकरी व नागरिकांचे नुकसान टाळावे अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध नियम लावून, गेवराई शहरातील बुधवारी भरणारा आठवडी बाजार अनेक महिने बंद करण्यात आला होता. मात्र या बाजार बंदचा आदेश असतानाही गेवराई शहरात मेन रोड, शास्त्री चौक, ताकडगाव रोड, मोंढा परिसर, सावता नगर आशा दळणवळणाच्या महत्त्वाच्या रस्त्यावर बाजार भरत होता. त्यामुळे रहदारीला अडथळा होत होता, तसेच शहरात सर्वत्र गर्दी झाल्याने कोरोनालाही निमंत्रण दिले जात होते. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य शासनाने लावलेले अनेक प्रतिबंध मागे घेतले, आठवडी बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिली. तरीही शहरात चार ठिकाणी अनाधिकृत बाजार भरणे सुरूच होते. त्यामुळे शास्त्री चौकातील मध्यवस्तीत असलेली बाजारपेठही ओस पडली. याचा फटका येथील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. याबाबत शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे यांनी शहरातील भर रस्त्यावर भरणारे चारही अनाधिकृत बाजार बंद करून, ते एकाच अधिकृत बाजार तळावर भरवावा अशी मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे केली होती. त्यासोबतच भाजीपाला उत्पादक शेतकरी, विक्रेते आणि व्यापारी यांनाही तसे आवाहन केले होते. या अनुषंगाने अखेर शास्त्री चौकातील नगर परिषद कार्यालयाच्या पाठीमागे आठवडी बाजार तळावर एकाच ठिकाणी अधिकृत आठवडी बाजार भरू लागला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू लागला असून, ग्राहकांनाही स्वस्त आणि ताजा भाजीपाला मिळत असल्याने दोघांचाही फायदा होऊ लागल्याने त्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. मात्र नगर परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे आजही बुधवारी मोंढा चौकातील रस्त्यावर काही भाजीपाला विक्रेते आणि व्यापारी बसत आहेत. त्यामुळे येथील रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे भाजीपाला विक्रेते मोंढा चौकातील रस्त्यावर बसत असल्याने त्यांना योग्य तो ग्राहक त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांचा कष्टाणे पिकवलेला भाजीपाला बेभाव किमतीने त्यांना विकावा लागत आहे. यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. नगरपरिषदेने तात्काळ या बाबत कारवाई करून, मोंढा चौक रस्त्यावरील बाजार बंद करावा. शेतकरी व नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी, एकाच बाजार तळावर त्यांना बाजार भरवण्यास भाग पाडावे अशी मागणी दिनकर शिंदे यांनी केली आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...