गेवराई सारख्या ग्रामीण भागातूनही चांगले खेळाडू पुढे गेले पाहिजेत. – डॉ भारतभुषन क्षीरसागर
गेवराई दि 16 ( वार्ताहार )
बीड जिल्हातील ग्रामीण खेळाडू हे राज्यासह देशात चमकले पाहिजेत त्यासाठी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने गेवराईतील खेळाडूंसाठी लेदर बॉल क्रिकेट साहित्य व दोन प्रशिक्षक देणार असल्याचे बीडचे नगराध्यक्ष भारतभुषण क्षिरसागर यांनी सागितले.गेवराई येथे जूनेद बागवान यांच्या वाढदिवसा निर्मित आयोजित करण्यात आलेल्या जे.बी.चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गेवराई नगरीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधूकर तौर,शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेख एजाज, पत्रकार आयुब बागवान, नगरसेवक जानमोहमंद बागवान, किशोर धोंडलकर,आप्पासाहेब कानगूडे, माजी नगरसेवक सय्यद एजाज, सरवर पठाण, एमआयएम तालुकाध्यक्ष मोमीन एजाज, पत्रकार भागवत जाधव, जूनेद बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मागील काही काळापूर्वी देशाच्या क्रिकेट मध्ये फक्त आणि फक्त मुंबई सारख्या मेट्रो शिटी सारख्या शहरातून खेळाडूंचा भरणा होत असे, मात्र यानंतर काळ बदलला असून ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या संधी उपलब्ध झाल्याने महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली सारखे मोठ-मोठे खेळाडू हे ग्रामीण भागातूनच पुढे आले असून आता देशाच्या मुख्य संघातही अनेक खेळाडू हे ग्रामीण भागातूनच पुढे आलेले आहेत. त्यामुळे आता आपल्या बीड जिल्ह्यातील गेवराई सारख्या ग्रामीण भागातूनही चांगले खेळाडू पुढे गेले पाहिजेत त्यासाठी आता यापुढे गेवराईकारांनी लेदर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करावे. यासाठी लागणारे लेदर किट व खेळपट्टी नेट हे साहित्य मी बीड जिल्हा असोशियशनचा अध्यक्ष या नात्याने लवकरच आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. तसेच यासाठी बीडहुन आपल्यासाठी दोन प्रशिक्षक ही याठिकाणी येऊन आपल्याला लेदर बॉल क्रिकेटचे धडे देतील असे सांगितले व जूनेद बागवान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जेबी चषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकांसह सर्व खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान डॉ.भरतभूषण क्षीररसागर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करून लगेचच याठिकाणी भीमशक्ती क्रिकेट क्लब व कुरबू रायडर्स या दोन संघात पहिला सामना खेळवण्यात आला.यावेळी आयोजक शेख अमजद, शेख उस्मान, शेख मोईन, शेख शहेदाद, सय्यद अलताफ परवेज बागवान, जैद हरबट, शेख अलमान, सय्यद रिजवान, शेख आफताब, आदिल कुरेशी, शेख आवेज, सोहेल बागवान, सय्यद अयाज, माजिद अत्तार यांच्यासह मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमींची उपस्थिती होती.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...