निराधारासाठी आयोजित केलेल्या विषेश शिबीराचा लाभ घ्यावा

तहसिलदार सचिन खाडे यांचे निराधारांना अवाहन

                       गेवराई दि १५ वार्ताहार
गेवराई तालुक्यातील दिव्यागं , विधवा , परितक्त्या महिला व निराधांरासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरून विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले तरी पात्र अर्जदार यांनी या शिबीरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा व याचा फायदा घ्यावा असे अवाहन गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी केले आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील गढी , तळेवाडी , किनगाव , ताकडगाव , कोल्हेर , मन्यारवाडी , पाढंरवाडी , गोंविदवाडी , मिरकाळा , वडगाव ढोक या गावातील दिव्यांग , विधवा , परितक्त्या अर्जदार यांनी दि १७ डिंसेबर रोजी तहसिल कार्यलयात सकाळी ११ वाजेपासुन दुपारी २ वाजेपर्यंत हे विषेश शिबीर आयोजित केले आहे तरी अर्जदार यांनी यांचा लाभ घ्यावा असे अवाहन गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *