मुंबईत आज रात्रीपासून मोर्चे, आंदोलन, रॅलीला परवानगी नाही, पोलिसांचे आदेश जारी;
मुंबईत आज रात्रीपासून ते 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई: दि 10 ( वार्ताहार ) मुंबईत आज रात्रीपासून ते 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. एमआयएमच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज रात्रीपासून 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबईत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही. एमआयएमकडून काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते. त्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी आदेश काढल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
अमरावती, नांदेड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. कोव्हिडचा नवा व्हेरिएन्ट ओमिक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याच मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटलेल आहे.
एमआयएमची मुंबईत रॅली
स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभर अमृत महोत्सव साजरे करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने एमआयएमने मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे आणि महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 11 डिसेंबर रोजी मुंबईत ही रॅली धडकणार आहे. खासदार इम्तियाज जलील जलील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मुंबईपर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. या सभेस बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी संबोधित करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी आज सुभेदारी विश्रा गृहात पत्रकार परिषदेत दिली.
इम्तियाज जलील हे स्वत: आमखास मैदान औरंगाबाद येथून अंदाजित 300 हुन जास्त चारचाकी गाड्यांच्या ताफ्यासह अहमदनगर – पुणे – पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे – लोणावळा – पनवेल यामार्गाने मुंबईला रवाना होणार आहेत. ताफ्यातील सर्व गाड्यांवर तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त एमआयएम पक्षाचा कोणताही झेंडा गाड्यांवर लावला जाणार नाही. याचप्रकारे बीड, जालना, नांदेड, परभणी, वर्धा, पुणे, नाशिक यांच्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून तिरंगा रॅली मुंबईत जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आमदारच पत्रकारांना शिविगाळ...
बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला - अमित गोरखे अनुसूचित जातीतील संशोधन करणाऱ्या 861 विद्यार्थ्यांना...
पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन...