गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू
गेवराई दि 24 ( वार्ताहार ) गेवराई शहराचे तलाठी शरद घोडके हे आपल्या खाजगी कार्यलयात काम करत असतांना त्यांना फेरफार मंजूर न करण्याच्या कारणा वरूण तिन ईसमानी जबर मारहान केल्याची घटना ( दि 24 रोजी ) साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली असल्याने या प्रकारामुळे गेवराई महसूल मध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर गेवराई सज्जाचे तलाठी शरद घोडके यांचे खाजगी कार्यलय आहे तसेच दररोज प्रमाणे ते आपल्या कार्यलयात काम करत असतांना सदरच्या कार्यलयात तिन ईसम घूसले व प्रलंबित फेरफार बाबद विचारना करू लागले याच कारणा वरूण त्यांच्यावर शाब्दिक बाचाबाची झाली याचे रूपातर मारहानीत झाले असून तलाठी शरद घोडके यांना तिन ईसमानी जबर मारहान केली असल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच यामध्ये ते जखमी झाले असून या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.