ठाणेदाराच्या आशीर्वादाने तपेनिमगाव व बोरगाव थडीतून वाळू उपसा
गेवराई दि 11 ( वार्ताहार ) जिल्हा महसूल प्रशासन आणि बीड जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कठोर पावला नंतर गेवराई तालुक्यातील चकलांबा आणि गेवराई पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या वाळू तस्करीला ब्रेक लागला असला तरी तलवाडा पोलिस ठाण्याच्या ठाणेदार यांच्या आशीर्वादाने जालना जिल्ह्यातून येणाऱ्या वाळू तस्करांनी हैदोस घातला असल्याचे चित्र या तलवाडा ठाणे हद्दीत पहायला मिळत आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्याील सावरगाव व बोरगाव या वाळू ठेक्यासह 78 हायवा यावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कार्यवाईचा बडगा उगारल्या पासून बीड जिल्ह्यात वाळू माफियांना चांगलाच दणका बसला आहे तसेच बीड पोलिसांना आपल्या कर्तव्य कठोर पणामुळे पोलिस दलात पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांची धास्ती आहे तसेच त्यांच्या आदेशाला न जूमानता तलवाडा पोलिस ठाण्यातून तपेनिमगाव आणि बोरगाव थडी या शिवारातून दररोज शेकडो हायवाव्दारे जोगलादेवी बंधाऱ्यामार्गे जालना जिल्ह्यातील वाळु तस्करांनी शिरकाव केला आहे या परिसरात ठाणेदारांनी आपल्याच मर्जीतील लोक या वाळूची मोहमाया गोळा करण्यासाठी लावली आहेत तसेच तलवाडा पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्याल्या पासुन ठाणेदार यांनी अवैध धंद्यावाल्याना नमस्कार घालण्याऐवजी एकही कार्य केले नाही ही बाब बीड जिल्हा पोलिस दलला लाजवेल अशी आहे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाणेदाराला शिस्तीच्या धडाची जाणिव करूण द्यावी अशी अपेक्षा जनसामान्यातून व्यक्त होत आहे.