वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात त्रीसदस्यीय समितीची होऊ शकते स्थापना

जिल्हाधिकारी यांच्या भूमिकेकडे लक्ष

 

बीड दि 6 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात काही दिवसांपुर्वी सुरू झालेला सावरगाव वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात आहे तसेच अधिकृत असतांना देखील अनाधीकृत पणे कसे?चालतात याचं पितळ जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या समोर उघडे पडल्यानंतर आता पुढे काय?असा प्रश्न अनेकांना पडला असला तरी जीपीएस असनाऱ्या गाड्या यांच्या खेपावरूण दंडाची रक्कम ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे तसेच वाळू घाटावर देखील दंडात्मक कार्यवाई होण्याच्या हालचाली सूरू आहेत या सगळ्या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे ते काय?निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात शासकीय नियमानूसार वाळू घाट सुरू करण्यात आले तसेच बोली प्रमाणे महसूल भरण्यात आला तहसिलदार यांनी ताबाही दिला परंतू टिप्पर मालक संघटनानी याला आठ दिवसांत विरोध दर्शविला तसेच थेट जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना टिप्पर मालक संघटनेनी निवेदन दिले तसेच जिल्हाधिकारी यांनी या वाहन धारक यांची भेटही घेतली आणि त्याच्यात चर्चाही झाली परंतू सावराव वाळू घाटचे टेंडर मालक यांच्याकडून 80 हजार रूपयात तिन खेपा ही बाब बेकायदेशीर असल्याचे निर्दशनास आले 60 जीपीएस वाहने यांच्या टोल अहवाल मागविला तसेच वाळू घाटाची पावती व यावर साांगली,कोल्हापूर चे ईनव्हॉईस आणि प्रत्यक्षात चौसाळा,बीड,गेवराई,माजलगाव,वडवणी,यापरिसरा शिवाय ही वाहने ईनव्हाईस ठिकाणी पोहचलीच नाही ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आली आणि ईथेच सगळं पितळ उघडे पडले आणि सगळी वाहने जप्त करण्याचे आदेश बीड पोलिस अधीक्षक व गेवराई तहसिलदार यांना प्राप्त झाले आहे तसेच महसूलच्या पथकाने तिन वाहने देखील जप्त केली आहे उर्वरीत वाहने जिल्हाबाहेर पळवली असल्याची माहिती आहे तसेच ही वाहने जप्त न केल्यास परिवाहन अधिकारी यांच्याकडून आर सी बूक प्रमाणे मालक यांची ओळख पटवली जाणार आहे तसेच यांच्या विरूद्ध दंडात्मक कार्यवाई होऊ शकते दंडाची पुर्तता न केल्यास वाहन मालकांच्या सातबारा यावर बोजा पडण्याची शक्यता आहे गून्हा दाखल करण्या संदर्भात अद्याप पर्यंत जिल्हा महसूल प्रशासनात हालचाली दिसत नाहीत तसेच वाळू घाट यांचा रितसर पंचनामा होऊ?शकतो तसेच राजपत्रीत अधिकारी यांच्या त्रीसदस्यीय समितीच्या स्थापणा होऊन यांचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या समोर जाऊ शकतो व यामध्ये वाळू घाट तसेच अधिकारी,कर्मचारी यांची विकेट पडू शकते यामुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या भूमिकेकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *