वाळूच्या सहा हायवावर तहसिलदार खोमणे यांची दबंग कार्यवाई

एक कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त

 

गेवराई दि 26 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात अनाधिकृत वाळू चोरी होत असल्याची माहिती गेवराईचे महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांना मिळाली होती त्यांनी सदर ठिकाणी आपल्या पथका सोबत छापा टाकला यामध्ये सहा हायवा पकडल्या असल्या आहेत या दबंग कार्यवाईमुळे वाळू माफियात खळबळ माजली असून एक कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच ही वाहने पुढील कार्ययाईसाठी गेवराईच्या आगार परिसरात लावली आहेत.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून राक्षसभूवन या गोदापात्रात अनाधिकृत वाळू चोरी होत असल्याबाबद च्या तक्रारी गेवराई महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांच्याकडे प्राप्त होता तसेच गेवराई महसूलचे पथकही कार्यन्वित होते तसेच आज ( दि 26 जानेवारी ) पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान गेवराईचे महसूल प्रमुखांना गोपनिय बातमी दाराने दिलेल्या माहिती नूसार राक्षसभूवन परिसरात अनाधिकृत वाळू चोरी होत असल्या बाबदची माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी आपल्या पथकासोबत छापा टाकला व चार मोठ्या हायवा व दोन डंम्पर अश्या एकूण सहा हायवावर कार्यवाई केली आहे तसेच या कार्यवाईत एक कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कार्यवाई वाळू तस्करात खळबळ माजली आहे तसेच सदरची कार्यवाई ही महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे,परम काळे मंडळ अधिकारी,अशोक डरफे मंडळ अधिकारी,सचिन खेत्रे तलाठी,अविनाश लांडे तलाठी, अशोक यमगर तलाठी, शेख अनवर तलाठी,पंकज शिरसकर तलाठी, किरण दांडगे तलाठी, गोविंद ढाकणे तलाठी,शुभम गायकवाड कोतवाल,संदिपान राऊत कोतवाल, विष्णू वायकर कोतवाल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *