चकलांबा पोलिसांच्या आशिर्वादाने वाळू तस्करीला बळ

गोदापात्रात पवार,आणि इंगोले दोन कर्मचारी यांच्या मार्फत वसूलीचा खेळ

 

गेवराई दि 23 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत गेल्या काही दिवसा पासून राक्षसभूवन व सुरळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे तसेच ठाणेदार यांच्या मर्जितील इंगोले व पवार नामक कर्मचारी हे वाळूची अनामत जमा करत असल्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे यावर वरिष्ठाचे देखील नियंत्रण नसल्याचे दिसुन येत असून या अनाधिकृत वाळू उपसा बंद करण्याच्या दृष्टीने महसूलचे देखील मौन वृत आहे तसेच अनाधिकृत वाळू उपस्याला चकलांबा पोलिसांचे बळ आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या काही दिवसापासून चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत वाळू उपस्याचा जोर वाढत चालला आहे तसेच वरिष्ठ अधिकारी यांना सर्वकाही अलबेल आहे असे भाकीत दाखविणाऱ्या चकलांबा पोलिसांचे पितळ उघडे पडत चालले आहे गेल्या अनेक दिवसा पासून राक्षसभूवन सुरळेगाव परिसरात अनेक केनी व हायवा लोडर यांच्या माध्यमातून अनाधिकृत वाळूची तस्करी केली जाते विषेश बाब म्हणजे काही पोलिस कर्मचारी यांची देखील वाहने वाळूची तस्करी करतात ही बाब चिंताजनक आहे तसेच गोदावरीची माया जमा करण्यासाठी पवार व इंगोले या दोन कर्मचारी यांची नियूक्ती केली असल्याची माहिती आहे हा वाळू उपसा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे रात्री 1 ते पहाटे 4 पाजेपर्यंतचा अल्टीमेंटम चकलांबा ठाणेदार यांनी वाळू माफियांना दिला असल्याचे समजते पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी या प्रकरणी जातिने लक्ष घालून या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषी विरूद्ध शासन नियमा प्रमाणे कायदेशीर कडक कार्यवाई करावी अशी मागणी जन सामान्यातून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *