अनाधिकृत वाळू उपसा करण्याचा जोर वाढला

चकलांबा पोलिस ठाण्यातूनच पोलिस अधीक्षकांना अवाहन 

गेवराई दि २२ ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत सुरळेगाव तसेच राक्षसभूवन परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करूण त्यांची तस्करीला मोठ्या प्रमाणात जोर वाढला आहे चक्क केन्या आणि वाळू भरून देणारे लोडर यात पोलिस कर्मचारीच पार्टनर आहेत अशी चर्चा वाळू तस्करात आहे चकलांबा पोलिस ठाण्याचे शासकीय वाहन मध्यरात्री 1 ते 4 चार वाजेपर्यंत कूणाच्या ताब्यात असते व कूणाच्या संरक्षणासाठी आहे याच उत्तर पोलिस अधीक्षकांनी द्यावे तसेच चकलांबा ठाण्यातूनच थेट अवैध वाळू तस्करीला बळ मिळत असून पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांना अवाहन दिले जात आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, गत काही दिवसापासून बंद पडलेला वाळू उपसा सुरू करण्यासाठी चकलांबा पोलिस ठाण्याने पुढाकार घेतला आहे वाळू माफियांनी एका कर्मचारी यावर हल्ला केला होता यामध्ये हात फॅक्चर असनारा कर्मचारीच या धंद्यात हात काळे करीत असल्याची चर्चा चकलांबा पोलिसांत दबक्या आवाजात सुरू आहे तसेच वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी केनी तसेच लोडर हे पोलिसच चालवत असल्याची माहिती आहे सुरळेगाव व राक्षसभूवन परिसरात सुरू असनाऱ्या वाळू उपस्यासाठी एलसीबी,चकलांबा ठाणेदार,आणि थेट तहसिलदार यांच्या नावावर प्रति हायवा 90 हजाराची सुपारी घेऊन वाळू उपसा सुरळीत करणारा पोलिस कर्मचारी कोण?यांची चर्चा संपुर्ण पोलिस दलात सुरू आहे तसेच पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी चकलांबा पोलिस ठाण्याचे वाहन रात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत कूणाच्या?संरक्षणासाठी उमापूर फाट्यावर असते यांची चौकशी करणे अपेक्षीत आहे व बेशीस्त झालेल्या चकलांबा पोलिसांना शिस्तीचा धडा देण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *