तहसिलदार यांना दादागिरी करून वाळू माफियांनी वाहने पळवली
चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल
गेवराई दि 6 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील बोरगाव शिवारात अवैैध वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती गेवराई महसूल प्रमुखांना मिळाली होती तसेच ( दि 5 जानेवारी ) रोजी मध्यरात्री याठिकाणी महसूलचे प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे आपल्या पथकासोबत सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले असता त्यांनी हायवा,लोडर सह आदी वाळू उपसा करण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली होती दरम्यान एका आरोपीने तहसिलदार यांना हूलकावणी देवून वाहने पळवली आहेत अशी फिर्याद चकलांबा पोलिसांत तहसिलदार संदिप खोमणे यांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बाळासाहेब बाबासाहेब हिंगे वय 34 वर्ष यासोबत ईतर सात ते आठ लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून महसूल प्रमुख अनाधीकृत वाळू उपसा करणारी वाहने जप्त करून घेऊन येत असताना एम 12 केटी 4146 चे चालक मालक तसेच शासनाच्या ताब्यात असनाऱ्या वाळू चोरी करत असतांना गैर कायद्याची मंडळी जमविली तसेच हायवा व लोडर घेऊन पळवून गेले तसेच तहसिलदार यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत.