गेवराई दि २१ ( वार्ताहार ) नगर परिषद निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर माजी नगर अध्यक्ष महेश दाभाडे यांनी कार्यकर्ते यांना साद घातली आहे आपण कुठेतरी कमी पडलो आपल्याला गेवराई करांनी दिलेला कौल मान्य आहे यापुढे आपण सदैव गेवराईतील जनतेच्या अडीचणीत जाऊ माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी कार्यकर्ते आणि मतदार यांचे आभार व्यक्त करतो अशी बोलकी प्रतिक्रीया माजी नगर अध्यक्ष महेश दाभाडे यांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई नगर परिषद निवडणूकीला सामोरे जात असतांना अनेक कठीण प्रसगांचा सामना करावा लागला माझा मित्र परिवार व शिवछत्र परिवारतील सगळे सदस्य यांनी आमच्या परिवारावर विश्वास टाकला मी यापुढे पराभवाने खचून न जाता पुन्हा गेवराई करांच्या सेवेत सदैव कार्यरत राहणार आहे हा पराभव मान्य आहे उलट गेवराई नगर परिषदेत आपल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे चार नगर सेवक निवडूण आले आहेत यासह संपुर्ण शहरात मा आ अमरसिंह पंडित व आ विजयसिंह पंडित यांच्या मार्गदशनाखाली गेवराई शहराचा सार्वागिन विकास करण्याचा प्रयत्न करू माझा पराभव मला मान्य आहे व कार्यकर्ते व गेवराईच्या बहादर मतदार यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.