गेवराई दि 20 ( वार्ताहार ) चकलांबा व गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू चोरीचे अनेक गून्हे दाखल असलेला आरोपी जामिनावर येऊन तेच कृत पुन्हा करत होता त्याच्यांत कसलाही सुधार येत नव्हता तसेच वाळू चोरी सारखा गंभीर गूून्ह्यात अनेकवेळा सहभाग असलेल्या गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन येथील एका आरोपी विरूद्ध एमपीडीए अंतर्गत कार्यवाई करण्यात आली असून यांच्या मुसक्या स्थानिक गून्हे शाखेच्या टीमने आवळल्या असून पुढील कार्यवाईसाठी त्याला चकलांबा पोलिसांच्या स्वाथीन करण्यात आले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राजेश उर्फ भोल्या बंडू नाटकर ( वय 27 वर्ष ) असे एमपीडीएतील आरोपीचे नाव असून सदरच्या ईसमावर गेवराई आणि चकलांबा पोलिस ठाण्यात वाळू चोरी सारखे गंभीर गून्हे दाखल होते तसेच या आरोपीला वेळोवेळी पोलिस प्रशासनाने प्रतिबंध केले होत त्यांच्याविरूद्ध अटकेच्या कायदेशीर कार्यवाई देखील करण्यात आल्या होत्या तरीही यामध्ये सुधारणा होत नव्हती म्हणून बीड पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि संदिप पाटील यांनी वरील आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठी एमपीडीए कायद्या अंतर्गत प्रस्ताव उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे पाठविला होता तसेच अंतिम मंजूरीसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला त्याला अंतिम मंजूरी मिळाली असून या आरोपीला एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यासाठी बीड स्थानिक गून्हे शाखेने यांच्या मुसक्या आवळल्या असून त्याला चकलांबा पोलिसांच्या स्वाधिन केले असल्याची माहिती या कार्यवाईने वाळू माफियात खळबळ माजली आहे सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल कडके,स्थानिक गून्हे शाखेचे सपोनि शिवाजी बंन्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोह राठोड,पोह वरपे,पोअं सलगर,पोअं चव्हाण,चालक मांजरे यांनी केली आहे.