गेवराई शहर सुजलाम सुफलाम करण्यासाठी एक संधी द्या – मा आ अमरसिंह पंडित

तूमच्या लेकीला व सुनेला पदरात घ्या अमरसिंह पंडित यांची गेवराई करांना भावनिक साद

गेवराई दि 1 ( वार्ताहार ) गेवराई नगर परिषदेच्या 20 जागेसाठी तसेच नगर अध्यक्ष पदासाठी उद्या (दि 2 डिंसेबर ) रोजी मतदान होणार आहे तसेच गेवराई शहरातील उज्वल भविष्य व भयमुक्त प्रशासन आणि विकास दृष्टीकोण समोर ठेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी निवडणूक लढवित आहे तसेच गेवराई शहर गेल्या विस वर्षापासून विकास पासून वंचित ठेवणाऱ्या अभद्र युतीतील पंडित – पवार यांच्या पॅनलच्या व त्यांच्या कूठल्याही भूलथापाना बळी न पडता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नगर अध्यक्ष पदाच्या अधीकृत उमेदवार सौ शितलताई महेश दाभाडे सह 10 प्रभागातील उमेदार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे अहवान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा आ अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या तिन दशकापासून आळीपाळीने गेवराई नगर परिषदेत निर्विवाद पवार – पंडित यांनी यांनी सत्तेचा उपभोग घेतला आहे जाती पातीचे राजकारण केले आहे तसेच नगर परिषद ही संस्था आपल्या मर्जीणे राबवली आहे विकासाच्या नावाखाली आपली खाजगी मालमत्ता डेवलप करणाऱ्या पवार घराण्याला गेवराईकरांनी घरचा रस्ता दाखवावा तसेच निवडणूकीत गेवराई करांना भावनिक करायचे आणि त्यांची मते मिळवायची नंतर त्यांना वाऱ्यावर सोडायचे अशी ज्वलंत उदारणे गेवराईच्या पवार परिवाराची आहेत सत्ता आपल्याच घरात असावी म्हणून ते या निवडणूकीला सामोरे जात आहेत गेवराई शहराच्या सार्वागिण विकास विकास करण्यासाठी तसेच व शेवटच्या प्रत्येक घटका पर्यंत नगर परिषदेच्या योजना प्रामाणिक पणे प्रयत्न करण्यासाठी सौ शितल महेश दाभाडे यांना या गेवराईच्या कन्येला गेवराई करांनी पदरात घ्यावे व मतदान रुपी आशिर्वाद द्यावेत व राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवार यांना विजयी करावे अशी भावनिक साद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा आ अमरसिंह पंडित यांनी गेवराई करांना घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *