गेवराई दि १५ ( वार्ताहार ) गेवराई तहसिल विभागात कार्यरत असनारा पुरवठा विभाग प्रमुखांच्या कारनाम्यांनी चर्चेत आला आहे याठिकाणी अर्थिक देवानघेवाण केल्याशिवाय सर्वसामान्य यांचे कामे होत नाहीत तसेच तहसिलदार यांचेही या विभागावर नियत्रंण नसल्याचे जानवत आहे तसेच या विभाग प्रमुख गजानन मोरे यांच्या अर्थिक च्या मागणीमुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील ज्या लाभार्थांना रेशन कार्ड नाही असे लाभार्थी गेवराई तहसिल कार्यलयाच्या पुरवठा विभागात रेशन कार्डसाठी अर्ज करतात अश्या लाभार्थी यांची अर्थिक पिळवणूक याठिकाणी सर्रास केली जाते ३००० हजार रूपये प्रति रेशन कार्ड प्रमाणे याठिकाणी सर्वसामान्य यांच्याकडून पैसे उकळले जातात ऐवढेच नसून स्वस्त धान्य दूकानदार यांनाही मोठ्या प्रमाणात अनामत मोजावी लागते तसेच याविरोधात आवाज उठवल्यास त्यांना दूकान तपासणीची धमकी दिली जाते तसेच गेवराई तालुक्यातील असंख्य शिवभोजन यांची बोगस बिले टक्केवारी घेऊन काढली जातात तसेच प्रतिमहा एक स्वस्त धान्य दूकानदार यांच्याकडून ३०० रूपये प्रति गहू व तांदूळ परमिटने अतिरिक्त लाच घेतली जाते याचा अकडा लाखोंच्या घरात आहे तसेच या ठिकाणी कर्तव्यास असनारे गजानन मोरे हे ही रक्कम हिटलर शाहिने वसूल करतात अशी चर्चा अनेक स्वस्त धान्य दूकानदार यांच्यात आहे तसेच,मादळमोही याठिकाणी असनारे धान्य गोडाऊम मध्ये सर्रास उंदिर व घूशीचा वावर असतो व ठरलेल्या व्यापाऱ्यांना याठिकाणी गहू तांदूळ काळ्या बाजारात विकला जातो गेवराईच्या पुरवठा विभागातचे प्रमुख गजानन मोरे यांना जिल्हाधिकारी यांनी आवर घालावा नसता शासनाची मालमत्ता विक्री देखील हे महाशय करतील यात मात्र शंका नाही
‘दोन कोतवाला मार्फत होतो मोरे करतात अर्थिक मागणी या पुरवठा विभागात दोन कोतवाल यांची नियुक्ती केलेली आहे गजानन वादे,सुधिर जोशी, यांच्या मार्फत पुरवठा अधिकारी मोरे पैश्याची मागणी करतात अश्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत.