गेवराई दि २८ ( वार्ताहार ) नगर परिषद निवडणूकीचे वातावरण तापले असून अनेक युवा चेहरे शहरातुन निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे तसेच शहरातील प्रभाग क्रं ६ मधून फहाद चाऊस यांचे नाव देखील आघाडीवर असून त्याच्यां मातोश्री यांना या प्रभागातून निवडणूकीला सामारे जाणार असल्याचे चित्र असून याठिकाणी त्यांना भाजपा कडून संधी मिळणार असल्याचे संकेत आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर गेवराई शहरात मुस्लिम मतांवर तसेच या समाजाकडे सगळ्याच पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे तरी शहरात निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर नेते मंडळी यांची चाचपणी सुरू आहे अद्याप तरी निवडणूकीचे बिगूल वाजले नसले तरी तर्क वितर्क मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत शहरातील प्रभाग क्रं ६ मध्ये फाहद चाऊस यांचे नाव आघाडीवर आहे याठिकाणी त्यांच्या कुटूंबियाला मानणारा मोठा चहिता वर्ग असल्याने त्यांच्या मातोश्री भाजप कडून प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...