शादीखान्याच्या इमारतीमुळे गेवराई शहराच्या वैभवात भर पडेल – अमरसिंह पंडित
गेवराईत २०० लक्ष रुपये किंमतीच्या शादीखाना बांधकामाचा शुभारंभ
गेवराई, दि.२६ ( वार्ताहार ) शहरात भव्य, प्रशस्त आणि सर्व सुविधा असलेली शादीखान्याची इमारत गेवराई शहराच्या वैभवात भर घालणारी ठरणार आहे. मुस्लिम समाज बांधवांचे विवाह सोहळे अल्प दरात पार पडावेत, मध्यम वर्गीयांसह गोर-गरीबांनाही मंगल कार्यालयातील विवाह आर्थिकदृष्ट्या परवडला पाहिजे या सामाजिक हेतूने गेवराई शहरात शादीखान्याची उभारणी होत आहे. या बांधकामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. त्यांच्या शुभहस्ते दारुलउलूम परिसरात सुमारे २०० लक्ष रुपये किंमतीच्या शादीखाना इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी मुफ्ती मोईनोद्दीन कासमी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीनंतर आ. विजयसिंह पंडित यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर मतदार संघातील विकास कामांना निधी मंजुर करून घेतलेला आहे. गेवराई शहरात दहा महिन्यांच्या कालावधीत चाळीस कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. अल्पसंख्यांक समाजाची मागणी आणि निवडणुकीत दिलेले आश्वासन लक्षात घेता आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई शहरातील दारुलउलूम परिसरात शादीखाना बांधकामासाठी सुमारे २०० लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. रविवार, दि.२६ ऑक्टोबर रोजी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते शादीखाना इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुफ्ती मोईनोद्दीन कासमी, बीड नगर परिषदेचे माजी नगरसेवक शेख निजाम, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, डॉ.एस.एस. पटेल, ज्येष्ठ नेते एस.वाय. अन्सारी, जालिंदर पिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की, अलिकडच्या काळात खाजगी मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी लागणारा खर्च सर्वसामान्य आणि मध्यम वर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. गेवराई शहरासह तालुक्यातील मुस्लिम समाजातील विवाह सोहळे अल्प खर्चात आणि सुसज्ज सुविधा असलेल्या मंगल कार्यालयात व्हावेत यासाठी या शादीखान्याची संकल्पना आपण वास्तवात आणली आहे. या इमारतीचे काम अतिशय दर्जेदार करून घेण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार आहे. समाज बांधवांनी एकत्रितरित्या केलेल्या सामुहिक मागणीमुळे तय्यबनगर भागातील दारुलउलूम येथे हे बांधकाम करत असल्याचे सांगताना अमरसिंह पंडित यांनी शहरात आणखी दोन ठिकाणी सार्वजनिक मंगल कार्यालयाची उभारणी करणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
मुफ्ती मोईनोद्दीन कासमी यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना आ. विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे मुस्लिम समाजाच्यावतीने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात बीड नगर परिषदेचे माजी नगरसेवक शेख निजाम यांनी बोलताना आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठिशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. जे.के.कन्स्ट्रक्शनचे बाबुभाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई, माजी नगरसेवक आवेज शरीफ, मंजुर बागवान, दादासाहेब घोडके, कृष्णा मुळे, सय्यद नजीब, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष खालेद कुरेशी, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, शेख शाफे, वसीम फारुकी, सरवर पठाण, ॲड.मनोज हजारे, विजय सुतार, हारून पटेल, मजहर बागवान, शेख सुभान, मोहसीन बागवान, सय्यद मतीन, बाबा शेख, विलास सुतार, संतोष आंधळे, गुफरान इनामदार, अजित इनामदार, शेख सादेक, सोमनाथ गिरगे, पत्रकार आयुब बागवान, अविनाश इंगावले, जावेद शेख, निहाल सय्यद यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...