सर्वसमावेशक चेहरा – पत्रकार जावेद शेख सर निवडणुकीच्या रणांगणात

गेवराई नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्र.11 मधून चाचपणी सुरू

गेवराई दि 14  (वार्ताहार ): गेवराई शहरात सुरू झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या चर्चेला आता एक नवे वळण मिळाले आहे. शहरातील सर्वपरिचित व सर्वसमावेशक चेहरा असलेले युवा पत्रकार जावेद शेख सर हे नगरसेवक पदाच्या शर्यतीत उतरू शकतात, अशी चर्चेला उधाण आले आहे. वार्ड क्रमांक  11 मधून ते मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक जनतेत याबाबत उत्सुकता आणि अपेक्षांचा सूर झळकत आहे.

जावेद शेख सर यांनी अनेक वर्षे समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य केले आहे. जात, धर्म, पंथ, वंश या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी “मानवतेचा धर्म सर्वोच्च” या तत्त्वावर काम केले. पत्रकारितेतून समाजातील वंचित, पीडित घटकांचा आवाज बुलंद करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने सामाजिक न्याय, पारदर्शकता आणि विकासाच्या मुद्द्यांवर सतत जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आज गेवराई शहरात त्यांचे नाव घेतले की — “विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व” अशीच प्रतिक्रिया उमटते.

माजी आमदार अमरसिंह पंडित व विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी जर जावेद शेख सर यांना अधिकृत उमेदवारीची संधी दिली, तर ते या भागात राजकीय करिश्मा निर्माण करू शकतात, अशी प्रबळ चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेमुळे सर्व समाजघटकांचा त्यांना व्यापक पाठिंबा लाभत आहे.

दरम्यान वार्ड क्रमांक 11 मधील नागरिक स्वतःहून जावेद शेख सर यांना संधी देण्याची मागणी करत आहेत काम करणारा चेहरा हवा, बोलणारा नाही असे जनतेचे स्पष्ट मत दिसत आहे.

राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देणारे स्वच्छ प्रतिमा व जमिनीवर काम करणारे पत्रकार जावेद शेख सर यांचा राजकारणात प्रवेश हा गेवराई नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या हालचालीने निवडणुकीच्या रंगात आता नव्या उत्सुकतेची आणि स्पर्धेची भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *