माजीमंत्री शिवाजीराव पंडित अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भागवत कथा व किर्तन महोत्सव

कलश पुजनाने भागवत कथा आणि किर्तन महोत्सवाचा प्रारंभ होणार

गेवराई, दि. २ (वार्ताहार ) माजी राज्यमंत्री शिवाजीराव(दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात शुक्रवार दि.३ ते १० ऑक्टोबर दरम्यान भावरत्न ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांची श्रीमद् भागवत कथा आणि महाराष्ट्रातील नामांकित गायकांचा सहभाग असलेली भजन संध्या आणि नामांकित किर्तनकारांचा सहभाग असलेला भव्य किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर रोजी कलश पुजनाने प्रारंभ होणार असून शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी शिवाजीराव (दादा) पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरीभाऊ (नाना) बागडे आणि संत महंताच्या उपस्थितीत होणार असून अभिष्टचिंतन सोहळ्यासह भागवत कथा, किर्तन महोत्सव आणि विविध कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शिवछत्र प्रेमींनी शुक्रवार दि.३ ते १० ऑक्टोबर दरम्यान भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शिवनगरी, र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे दररोज दुपारी २ ते ५ यावेळेत भावरत्न ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांची श्रीमद् भागवत कथा होणार आहे. दररोज सायं. ६ ते ८ या वेळेत भजन संध्या होणार असून रात्री ८ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांची किर्तनसेवा होणार आहे.

राज्यपाल महामहीम हरीभाऊ (नाना) बागडे यांच्या हस्ते शिवाजीराव पंडित यांचा सत्कार शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा मुख्य अभिष्टचिंतन सोहळा राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरीभाऊ (नाना) बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासह विविध संत महंत आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे

अभिष्टचिंन सोहळ्याच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा समितीने जय्यत तयारी केली आहे. सोहळ्यात आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, भजन संध्या आणि किर्तन महोत्सवात सहभागी होवून सत्संगाचा लाभ घेण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *