अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरने मदत करावी

भीमशक्ती युवामंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

गेवराई दि २६ ( वार्ताहार ) तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे तसेच यामध्ये लाखों हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्या कारणाने तात्काळ सरकारने ५० हजार रूपये हेक्टरी मदत करून शेतकरी यांची थकीत कर्जमाफी करावी अशी मागणी भीमशक्ती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश सौंदरमल यांनी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या दहा दिवसापासून गेवराई तालुक्यात सर्वच महसूली मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे तसेच शेतकरी यांचे पिके वाहून गेली आहेत तसेच गायरान धारक यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यांची गंभीर दखल सरकारने घ्यावी व सरसकट ५० हजार रूपये हेक्टरी प्रमाणे मदत करावी अशी मागणी भीमशक्ती युवमंचच्यावतिने संस्थापक अध्यक्ष महेश सौंदरमल,ऋतिक कांडेकर,फहाद चाऊस,प्रदिप पाटोळे,मॉन्टी माटे,विक्की सोनवणे,धम्मदिप वाघमारे,विक्की निकाळजे,समाधान शिंदे,विकास सौंदरमल,यांनी निवेदनाव्दारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *