डायलिसीस सुविधेचा लाभ गरजु रुग्णांनी घ्यावा – आ. विजयसिंह पंडित

गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आठ डायलिसिस मशिन कार्यान्वीत

 

गेवराई, दि. १८ (प्रतिनिधी) ः- किडणी विकार असलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा अतिशय महत्वाची आहे. डायलिसिस साठी लागणारा हजारो रुपयांचा खर्च आता वाचणार असुन महायुती सरकारने तालुकास्तरावर आशा वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करुन दिल्या आहेत. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आठ डायलिसिस मशिन आजपासुन कार्यरत होत असुन महाडायलिसिस सेंटर कार्यान्वीत होत असल्यामुळे गोर-गरीब किडणी रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे डायलिसिस सुविधेचा लाभ गरजु रुग्णांनी घेण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील महाडायलिसिस सेंटर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत, अधिक्षक डॉ. सुरज कोठावळे, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी नगरसेवक शांतीलाल पिसाळ, राधेशाम येवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे यांच्यासह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य विभाग, एचएलएल लाईफ केअर लि. व उपजिल्हा रुग्णालय, गेवराई यांच्या माध्यमातुन किडणी विकार रुग्णांच्या मोफत डायलिसिस उपचारासाठी आठ डायलिसिस मशिनसह महाडायलिसिस सेंटर उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे सुरु करण्यात आले आहे. गुरुवार दि. १८ सप्टेंबर रोजी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते महाडायलिसिस सेंटर चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत, अधिक्षक डॉ. सुरज कोठावळे, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, विनोद सौंदरमल, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई, माजी नगरसेवक शांतीलाल पिसाळ, राधेशाम येवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक काळे, बंटी सौंदरमल, दत्ता दाभाडे, जे.के. बाबुभाई, संदिप मडके, जिजा पंडित, विलास निकम, अ‍ॅड. मनोज हजारे, शेख सुभान, संतोष सुतार, सतिष प्रधान यांच्यासह गेवराई शहरातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

किडणी विकाराच्या रुग्णांना डायलिसिस उपचार अतिशय महत्वाचे आणि जीवन संजिवणी ठरणारे आहेत. डायलिसिस उपचार महागडे असल्यामुळे अनेक वेळा गोर-गरीब रुग्णांना आर्थिकदृष्या परवडत नाहीत. महायुती सरकारने महाडायलिसिस सेंटरच्या माध्यमातुन सर्वसामान्यांसाठी हे उपचार मोफत उपलब्ध केले आहेत. किडणी विकास रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उद्घाटन प्रसंगी दोन रुग्ण डायलिसिस साठी आले आहेत यावरुन या रुग्ण संख्येचे प्रमाण लक्षात येते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांनी यासेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केले. आ. पंडित यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेवुन संबंधितांना सुचना केल्या. गेवराई डॉक्टरर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ. अशोक काळे व त्यांच्या संघटनेतील सहकार्‍यांनी गेवराई शहरात महाडायलिसिस सेंटर सुरु करुन गोर-गरीब रुग्णांना डायलिसिस सुविधा उपलब्ध करुन दिल्या बद्दल आ. विजयसिंह पंडित यांचा या कार्यक्रमात सत्कार करुन आभार व्यक्त केले.

यावेळी डॉ. रांदड, डॉ. नोमानी, डॉ. शिंदे, डॉ. आंधळे, डॉ. शेख, मंगेश खरात यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्संगी स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुरज कोठावळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *