गेवराई दि १७ ( वार्ताहार ) गेवराई शहरातील संजय नगर भागात राहणाऱ्या एका युवकावर पैश्याच्या खाजगी व्यवहारातून कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना (दि १५ )रोजी शहरातील आंबेडकर चौकात सायकांळच्या सुमारास घडली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,संतोष नंदू सांवत ( वय २५ वर्ष ) राहणार संजय नगर गेवराई असे या वार झालेल्या तरूणाचे नाव आहे तसेच ह्या तरूणाचे मित्राचे पैसे असल्याची माहिती आहे समोरच्या व्यक्तीने पैसे देतो म्हणून बोलावले व एक शब्द ही तोंडातून न काढता या युवकावर सपासप कोयत्याने वार करण्यास सुरूवात केली तसेच यावर डोक्यात व पाठिवर कोयत्याने वार केल्याने ह्या तरूणावर बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे तसेच या घटनेमुळे गेवराई शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुवैस्थेला गालबोट लागले असून पुन्हा ऐकदा खाजगी सावकारीचा मुद्दा चर्चेत आला आहे याकडे पोलिस प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची आवश्यक्ता आहे.