गेवराई दि १६ ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे गेल्या काही महिण्यापासुन वादाच्या भोवऱ्यात आहे याठिकाणी स्थानिक ठाणेदार यांच्या मर्जितून अनेक अवैध धंद्याना बळ मिळत आहे गूटखामटका,अवैध दारूविक्री,यासह अनेक अवैध धंद्याचे माहेरघर चकलांबा पोलिस ठाणे हद्द झाली असून वरिष्ठांनी याठिकाणी लक्ष घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाण्यात अनेक वाळू प्रकरणातील गून्हाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच यासंबधीत गून्ह्यातील जप्त वाळूला तसेच जप्त वाहनाला देखील ठाणेदार यांच्या मर्जिने पाय फूटले आहेत असून स्थानिक परिसरात अवैध दारूविक्री,पत्याचे क्लब,मटका,यासख्या असंख्य अवैध धंद्याचे केंद्र चकलांबा पोलिस ठाणे हद्द बनली आहे याकडे अनेक वेळा वरिष्ठ पातळीवर नागरिकांच्या तक्रारी प्राप्त आहेत यावर वरिष्ठानी ठोस पाऊले उचलावीत आणि या ठिकाणी पारदर्शक अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी स्थानिक नागरीकातून होऊ लागली आहे.