गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे – तहसिलदार संदिप खोमणे
गेवराई दि १४ ( वार्ताहार ) तालुक्यातील गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच परिसरात विनाकारण फिरू नये प्रशासनास योग्य ती मदत करण्यासंदर्भात गावातील तलाठी,मंडळ अधिकारी,यांना याबाबदच्या शासन स्तरावरच्या सुचना देण्यात आल्या आहेत तसेच गोदावरी परिसरातील गावातील नागरिक यांनी गोदाकाठ परिसरात जाऊ नये असे अहवान गेवराई महसुल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी केले आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या दोन दिवसा पासुन परतीच्या पाऊसांची सुरूवात झाली आहे गेवराई तालुक्यातील दहाही महसुली मंडळात जोरदार पाऊस पडला असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे तसेच अनेक शेतजमिन व गोदाकाठ तसेच गोदावरी पात्र दूथडी पाण्याने वाहू लागली आहे यामध्ये काही गावांचा संपर्क तूटला आहे प्रशासन यासाठी सतर्क असून गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी गोदापात्र परिसरात जाऊ नये यामध्ये जिवित हानी होऊ शकते अधिक माहिती साठी नागरिकांनी नायब तहसिलदार,+917841009999/+919420031414 या क्रंमावर संपर्क करावा असे अवाहान गेवराईचे महसुल प्रमूख तहसिलदार संदिप खोमणे यांनी केले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...