उप विभागीय अधिकारी अनिल कटके यांनी पदभार स्विकारला

 

गेवराई दि ११ ( वार्ताहार ) गेवराई उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ नीरज राजगूरू यांची शेवगाव याठिकाणी बदली झाली असल्याने गेवराई या ठिकाणी नुतन उप विभागिय अधिकारी म्हणून अनिल कटके यांनी पदभार स्विकारला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गत तिन वर्षापासुन गेवराई तालुक्यातील कायदा व सुवैस्था आबाधित राखण्यात उप विभागीय पोलिस अधिकारी निरज राजगूरू यांना यश आले होते तसेच याच कार्यकाळात त्यांनी गेवराई तालुक्यात कूविख्यात गुंड प्रवृत्तीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कार्यवाह्या करून त्यांना हद्दपार केले आहे अनेक वाळू सारख्या गून्ह्यात त्यांनी कोट्यावधिपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त केला आहे ते एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती तसेच गेवराई याठिकाणी त्यांचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांची शेवगाव जि आहिल्यानगर याठिकाणी बदली झाली आहे तसेच गेवराई उप अधिक्षक पदाचा पदभार नुतन अधिकारी अनिल कटके यांनी स्विकारला असुन अवैध गून्हेगारी तसेच वाळू तस्करी रोखण्याचे अवहान त्यांच्यासमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *