गेवराईत पवार गटाला मोठा धक्का नगर सेवक धम्मपाल सौंदरमल करणार राष्ट्रवादीत प्रवेश
गेवराई दि 5 ( वार्ताहार ) गेवराई नगर परिषदेचे नगर सेवक धम्मपाल सौंदरमल हे लवकरच मा आ अमरसिंह पंडित यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती असून येत्या रविवारी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर हा गेवराईच्या पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,नगर परिषद निवडणूक काही महिण्यावर येवून ठेपली आहे त्याच पार्श्वभूमिवर गेवराईच्या राजकारणात मोठे फेरबदल होत असल्याचे दिसून येत आहे तसेच ही निवडणूक पंडित पवाराच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे त्यातच गेवराईच्या पवार गटाचा नगर सेवक मा आ अमरसिंह पंडित यांच्या हाती लागला असल्याने पवार गटाला मोठा धक्का लागण्याचे संकेत आहेत प्रभाग क्रं 6 मध्ये नगर सेवक धम्मपाल सौंदरमल यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच त्यांच्या प्रवेशाने या प्रभागात मा आ अमरसिंह पंडित गटाचे पारडेजड होणार आहे तसेच येत्या दोन दिवसानंतर मा आ अमरसिंह पंडित यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून व त्यांच्या उपस्थित ते प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.