सिंदफना नदी पात्रात शेतकरी गेला वाहून

 

गेवराई दि.4(वार्ताहार ) सिंदफना नदीच्या पात्रात शेतकरी वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. पोलीस अन् महसूल प्रशासनाकडून वाहून गेलेल्या शेतकन्याचा शोध सुरु आहे. शोध लागत नसल्याने अखेर आज छत्रपती संभाजीनगर येथील एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.

 याबाबद सविस्तर माहिती अशी की,संदीपान स रामकिसन ढोरमारे (वय ५०) रा. पिंपळगाव कानडा, ता. गेवराई, जि. बीड असे वाहून गेलेल्या शेतकन्याचे नाव आहे. बुधवारी शेतकरी संदीपान ढोरमारे हे शेतात जात असताना दुधडी भरून वाहत असलेल्या सिंदफणा नदीच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, अशी माहिती समोर आली आहे, यावरुन पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्याचा शोध सुरु केला. दिवसभर शोधकार्य सुरुच होते मात्र अंधार ‘होताच शोधकार्य थांबविण्यात आले. गुरुवारी सकाळीच पुन्हा शोध घेण्यास प्रारंभ केला. मात्र, शोध लागत नसल्याने अखेर पोलीस व महसूल प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर येथील एनडीआरएफ पथकास पाचारण केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *