विष्णुपंत बेदरे याचं र्‍हृदयविकाराच्या धक्याने  निधन

 

गेवराई दि 3 ( वार्ताहार )  : गेवराई नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णुपंत साहेबराव बेदरे पाटील [ वय वर्ष 78 ] यांचे बुधवार ता. 3 रोजी सकाळी सात वाजता बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. मंगळवार ता. 2 रोजी त्यांना र्‍हृदयविकाराचा त्रास झाल्याने, त्यांना बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

  सामाजिक कार्यकर्ते बप्पासाहेब बेदरे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बुधवार ता. 2 रोजी दु. दोन वाजता, बेदरे स्मशानभूमीत [ नवीन बसस्थानका जवळ ] अंत्यसंस्कार करण्यात आले. विष्णुपंत बेदरे हे गेवराई नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. नगर परिषदेच्या पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून ही, त्यांनी यशस्वी काम केले. कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांनी नगर परिषद पतसंस्थेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला होता. गेवराई नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातला आदर्श कर्मचारी म्हणून त्यांची नोंद झाली. ते मितभाषी होते. चांगला अधिकारी, या अरथाने त्यांची समाजाच्या विविध भागात ओळख होती. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.तसेच बेदरे स्मशान भूमित शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते त्यांच्या दूखा;त आंदोलन परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *