भोलोबा गीत सारख्या लोककलेला प्रोत्साहन देण्याचे काम शिवछत्र परिवार करत आहे – सपोनि माधुरी मुंढे
जयसिंग पंडित यांच्या मुख्य उपस्थितीत भोलोबा गीत स्पर्धेचा पारितोषीक वितरण समारंभ
गेवराई दि.4 ( वार्ताहार ) गेवराई शहरातील टिपरे आणि भोलोबा गीत या स्पर्धेतून सांस्कृतिक ठेवा आणि परंपरा जोपासण्याचे काम शिवछत्र परिवार करत असून या स्पर्धेच्या निमित्ताने महिलांना व्यासपीठ उपलब्ध होऊन प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन वाहतूक शाखेच्या सहा पोलीस निरीक्षक माधुरी मुंढे यांनी केले. भोलोबा गीताच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील जेष्ठ आणि वयोवृद्ध महिला भगिनीचा सहभाग उल्लेखनीय आहे. या लोककलेचा वारसा जुन्या पिढीने नव्या पिढीला दिली पाहिजे असे प्रतिपादन शिवशारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांनी केले. महिलांच्या कलागुणांना संधी मिळवून देण्याचे काम आ. विजयसिंह पंडित यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केले आहे, त्यामुळे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी सांगितले. नागपंचमी निमित्त आयोजित केलेल्या भोलोबा (फेर) गीत स्पर्धेच्या पारितोषीक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी परिक्षकांसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संघांनी आपल्या कलाविष्काराचे प्रदर्शन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शारदा प्रतिष्ठानच्या पारितोषीक वितरण समारंभाला शिवशारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुंढे, प्राचार्या डॉ. रजनी शिखरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, दादासाहेब घोडके, संतोष सुतार, स्पर्धा परिक्षक अॅड. सुभाष निकम, प्रशांत रुईकर, शाहीर विलास सोनवणे, विष्णूप्रसाद खेत्रे, प्रकाश भुते यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शारदा प्रतिष्ठानच्या टिपरे महोत्सवात भोलोबा फेर गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत एकलिंगेश्वर महिला मंडळ, पाडळसिंगी यांनी प्रथम क्रमांक मिळवत ५ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह, मनेश्वर महिला मंडळ, तळेवाडी यांनी व्दितीय क्रमांक मिळवत ३ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, गौराई कलाश्री महिला मंडळ, गेवराई यांनी तृतीय क्रमांक मिळवत २ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषीक पटकावले. यावर्षी पासून लक्षवेधी पुरस्कार जाहीर करण्यात आले, त्यात जगदंबा महिला मंडळ, गेवराई, झुंजार महिला मंडळ, गेवराई, मन्यारवाडी महिला मंडळ, मन्यारवाडी, महारुद्र महिला मंडळ, ठाकर आडगांव यांना प्रत्येकी १ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्रीमती कलावती गायकवाड (गायिका), श्रीमती सुलोचना चौधरी (गायिका), श्रीमती व्दारकाबाई आतकरे (गायिका), श्रीमती शिवराणी दावनगिरे (गायिका) श्रीमती शुभांगी राजुरकर (लाजाळू), श्रीमती उषाताई मडके (गायिका), श्रीमती शिवगंगा मुळक (गायिका), श्रीमती कोंडाबाई भंडारे (गायिका), श्रीमती संगिता ढाकणे (गायिका) यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
परिक्षक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष निकम म्हणाले की, टिपरे महोत्सवाच्या माध्यमातून गेवराई शहराच्या लोप होत चाललेल्या परंपरा आणि लोककलेला जतन करण्याचे काम शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आ. विजयसिंह पंडित यांनी केल्याचे सांगून त्यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. आपल्या प्रतिनिधीक मनोगतात परिक्षक सुमंत रुईकर यांनी आ. विजयसिंह पंडित यांनी परिक्षकावर विश्वास टाकला, त्यामुळे आम्हाला पारदर्शक काम करता आले. महिलांना आपल्या कलागुणांना व्यक्त होण्यासाठी त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे असेही ते यावेळी म्हणाले. परीक्षक प्रतिनिधी म्हणून प्रशांत रुईकर यांनी मनोगत व्यक्त करून शारदा प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला.
भोलोबा फेर गीत स्पर्धेत महिलांचा वाढणारा सहभाग पाहून पारितोषिकांच्या रखमेत वाढ करुन प्रथम पारितोषिक रोख रुपये ११ हजार, द्वितीय पारितोषिक रोख ७ हजार आणि तृतीय पारितोषिक रोख ५ हजार पुढच्या वर्षीपासून दिले जाणार असल्याची घोषणा शिवशारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांनी केली
प्रातिनिधिक स्वरूपात सौ. प्रियंका कोकाट यांनी मनोगत व्यक्त करुन आ. विजयसिंह पंडित आणि शारदा प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मन्यारवाडी येथील भजनी मंडळाच्या कुशावर्ता टकले, जनाबाई घाडगे, चंद्रकला जगताप, सुमन बरगे, वृंदावनी घाडगे यांनी ‘ जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या ‘भजन सादर करून तर पाडळशिंगी भजनी मंडळाच्या महिला मंडळांनी ‘ समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे ‘ हा अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. मुक्ताताई आर्दड यानी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गेवराई शहर आणि परिसरातील महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...