बीड जिल्ह्याच्या विकासात महसुल विभागाचे उल्लेखनीय योगदान – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

 

गेवराई दि 1( वार्ताहार ) आज 1 ऑगस्ट रोजी राज्यभर साजरा केला जाणा-या महसुल सप्ताहा अतंर्गत महसुल दिन आज शिवनेरी लॉन्स, ताकडगाव रोड, गेवराई येथे साजरा करण्यात आला. सदर महसुल दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन हे होते. कार्यक्रमाचे उदघाटन गेवराईचे लोकप्रिय आमदार श्री. विजयसिंह पंडित साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सदर वेळी प्रमुख उपस्थितीथी मा. श्री. जितीन रहेमान सो मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड, अप्पर जिल्हाधिकारी श्री. हरिष धार्मिक सो., उपजिल्हाधिकारी भुसंपादन, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे उपस्थित होते. मा. आमदार श्री. विजयसिंह पंडित यांनी दिप प्रजोलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली. मा. जिल्हाधिकारी यांनी शिव प्रतिमेचे पुजन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिवकुमार स्वामी यांनी केले.

सदर वेळी सर्व मान्यवरांचे स्वागत बीड उपविभागातील उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव, गेवराईचे तहसिलदार श्री. संदीप खोमणे, बीडचे तहसिलदार श्री. चंद्रकांत शेळके, गेवराईचे सर्व नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागातील व जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील, शिपाई, महसुल सेवक, महसुल सहाय्यक, ग्राम महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, नायब तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल व पुष्प गुच्छ देऊन यतोचीत सन्मान करण्यात आला.सदर वेळी सन 2024-2025 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचा सेवापुर्ती बाबत मा. जिल्हाधिकारी व मा. आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह,देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महसुली अधिकारी व कर्मचारी यांचे पाल्यांनी शैक्षणिक व क्रिडा कला क्षेत्रात विषेश प्राविण्य मिळवले त्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर व्यासपिठावर उपस्थित विविध महसुली संघटनाचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मा. श्री. जितीन रहेमान सो मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड, मा. आमदार श्री. विजयसिंह पंडित सो., व मा. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन सो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी आमदार महोदय यांनी जिल्ह्या मध्ये विविध क्षेत्रामध्ये महसुल विभाग अतिशय सचोटीने कामे करीत असुन जनतेची अपेक्षा वाढलेली असताना त्या कसोटीस उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. या बरोबरच मा.श्री. जितीन रहेमान सो. यांनी शासनाचा महसुल विभाग हा प्रमुख विभाग असुन सदर विभागाच्या मदतीने शासनाचे नैसर्गिक आपत्ती, सर्व प्रकारच्या निवडणुका, शासनाच्या विविध योजना, सार्वजनिक अन्न वितरण प्रणाली असे सर्व महत्वाचे शासनाचे धोरणाची अमंलबजावणी महसुल विभाग यांच्या माध्यमातुन राबवली जातात, असे गौरव उद्‌गार काढले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. चाटे सर यांनी केले असुन तहसिलदार श्री. संदीप खोमणे यांनी उपस्थित जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बंधु, रेशन दुकानदार, गेवराईचे विशेष अर्थसहाय्य योजनेचे संबधित पदाधिकारी या सर्वाचे आभार मानले व महसुल दिना निमीत महसुल विभाकडुन जनतेच्या वाढलेल्या आश्वसनाची पुर्तता करण्याचे सर्व महसुल विभाग हिरारीने प्रयत्न करण्यात येईल असे महसूल विभागाच्या वतिने अश्वासीत करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *