वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना
पीटीआर देण्यासाठी कायदेशीर मार्ग काढू – अमरसिंह पंडित

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष ना. समीर काझी यांच्या उपस्थितीत गेवराई नगर परिषदेत बैठक

गेवराई, दि.4 (वार्ताहार ) – माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नांमुळे केवळ गेवराई नव्हे तर मराठवाड्यातील अतिक्रमण धारकांचा प्रश्न निकाली निघणार आहे. घरकुल बांधकामासाठी लागणारी नाहरकत देण्याकरीता कायदेशीर बाबी तपासून वक्फ बोर्ड सहकार्य करेल असा विश्वास वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिला. वक्फ बोर्डाच्या जागेवर सुमारे २५ वर्षांपूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना घरकुल बांधकामासाठी आवश्यक पीटीआर उपलब्ध करण्यासाठी कायदेशीर मार्ग काढण्यात येईल असे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिले. गेवराई नगर परिषदेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यामुळे गेवराई शहरातील वक्फ बोर्डाच्या जागेवरील ४३८ रहिवाशी कुटूंबाला घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

गेवराई शहरातील संजयनगर सह इतर भागातील अतिक्रमण धारकांच्या हक्काच्या पीटीआर चा प्रश्न मागील वीस वर्षांपासून प्रलंबित होता. आ. विजयसिंह पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून गेवराई शहरात मोठे काम सुरु असून एकट्या संजयनगर भागात सुमारे १४०० रहिवाशांना लवकरच पीटीआर उपलब्ध होणार आहेत. शासन जागेवरील अतिक्रमणा बरोबरच वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना पीटीआर उपलब्ध करून त्यांना घरकुल मंजुर व्हावे या उद्देशाने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून शुक्रवार, दि.४ जुलै रोजी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या उपस्थितीत गेवराई नगर पालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला वक्फ बोर्डाचे उप कार्यकारी अधिकारी मुशीर शेख, जिल्हा व्यवस्थापक आरसलान शेख, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, महसुल विभागाचे मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, बाजार समितीचे सभापती मुजीब शेख, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी नगरसेवक राधेशाम येवले, वसीम फारोकी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तय्यबनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला इयत्ता ८ वी चा नवीन वर्ग सुरु झाल्याचा मान्यता आदेश यावेळी ना. समीर काझी आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते संबंधितांना देण्यात आला.

यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना वक्फ बोर्डाचे अध्यक्ष ना. समीर काझी म्हणाले की, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांत वक्फ मालमत्तेवरील तत्कालीन भाडेकरू व अतिक्रमण धारक यांचे अतिक्रमण नियमाकुल करणे तसेच त्यांना या जागेवर नवीन घरकुल बांधकाम करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे हा विषय प्रलंबित आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पुढाकारामुळे केवळ गेवराई नव्हे तर सबंध मराठवाड्यातील रहिवाशांचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे. गेवराई नगर परिषदेने या बाबत दिलेल्या प्रस्तावाचा वक्फ बोर्ड सकारात्मक विचार करेल असा विश्वास त्यांनी या बैठकीत दिला. वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुशीर शेख यांनी या बाबतची तांत्रिक बाजू बैठकीत मांडली.

गेवराई शहरात मागील २५ वर्षांपूर्वीपासून अल्पसंख्यांक समाजाचे अनेक रहिवाशी वक्फ मालमत्तेवर भाडेकरू म्हणून राहत होते. वर्षानुवर्षे ते या जागेत वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडे या वास्तव्याचे पुरावे आहेत. शहरातील शासन जागेवरील अतिक्रमण धारकांना ज्या धर्तीवर आपण हक्काचे पीटीआर देऊन मागील वर्षांपासूनचा निकाली काढला तसा वक्फ बोर्डाच्या सहकार्याने हाही प्रश्न निकाली काढू, यासाठी वक्फ बोर्डासह राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडेही पाठपुरावा करून कायदेशीर मार्ग काढणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गेवराई शहरातील ४३८ अतिक्रमण धारकांना पीटीआर आणि घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. गेवराई शहरातील तय्यबनगरसह भुमापन क्र.२१२ मधील रहिवाशांना हक्काचा पीटीआर मिळणार आहे. या बैठकीच्या आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष वसीम फारोकी यांनी विशेष प्रयत्न केले. अल्पसंख्यांक समाजाचे रहिवाशी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, माजी नगरसेवक कृष्णा मुळे, बंटी सौंदरमल, धम्मा भोले, सरवर पठाण, सुभान सय्यद, कडूदास कांबळे, जालिंदर पिसाळ, शेख राजू, सुभाष गुंजाळ, विलास सुतार, संतोष सुतार, नवीद मशायक, दत्ता दाभाडे, संतोष आंधळे, अक्षय पवार, जे.के.बाबुभाई, राम पवार, मनोज हजारे, शेख रहीम, प्रभाकर भालशंकर, सय्यद मोईन, रफिक सय्यद, सलमान सय्यद, मुफ्ती इफ्तेकार शामीर मौलाना, मोईन मौलाना, रज्जाक मौलाना, सय्यद सादेकभाई, सय्यद अख्तारभाई, सय्यद मोयीब, सय्यद अजहर, शेख शोएब यांच्यासह वक्फ बोर्ड आणि नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *