गेवराई दि 1 ( वार्ताहार ) गेल्या काही दिवसांपासुन गेवराई नगर परिषद अंतर्गत विविध ठिकाणी रस्ते,नाली,तसेच अन्य विकास कामे प्रगती पथावर सुरू असून कोट्यावधीचा निधी वापरून करण्यात येनाऱ्या विकास कामे याबाबद गेवराई शहरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे तसेच गेवराई शहरात विकासांची गंगा वाहू लागली असून मा आ अमरसिंह पंडित यांनी विकास कामाचा दर्जा दाखविला असल्याने येणाऱ्या काळातील निवडणूकीत यांचा फायदा त्यांना होणार असल्याचे संकेत आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई शहरात काही ठराविक भागात विकास करूण जनतेची दिशाभूल करनाऱ्या लोकांपासून जनता दूर गेली आहे गेवराई शहतील अनेक बहूतांश भागात गेल्या पंदरा वर्षापासून कसलाही विकास झालेला नव्हता याच बाबींची दक्षता घेऊन मा आ अमरसिंह पंडित यांनी सदर ठिकाणी सिमेंट रस्ते व नाली बांधकाम यासह अनेक कोट्यावधी रुपयांचा कामाचा धूमधडाका लावला आहे तसेच दर्जेदार कामामुळे जनतेत त्याच्या विषयी सकात्मक उर्जा निर्माण झाली असून उत्तम कामांच्या दर्जामुळे नागरिक समाधानी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच येणाऱ्या काही महिन्यात नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे त्या अंनूषगाने ही विकास कामे सुरू आहेत विकास कामांचा दर्जा पाहता या निवडणूकीत त्यांना यश प्राप्त होईल असे मत अनेकजन व्यक्त करीत आहेत.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...