गेवराई न्यायालय इमारतीच्या विस्तारीत बांधकामासाठी 10.2 कोटी रु. निधी मंजुर – आ. विजयसिंह पंडित
आ. पंडित यांच्याकडून उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त
गेवराई, दि.19 ( वार्ताहार ) गेवराई दिवाणी न्यायालय इमारतीच्या विस्तारीत बांधकामासाठी 10 कोटी 2 लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला असून या कामास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. गेवराई येथील न्यायालयाच्या अस्तित्वातील इमारतीवर अतिरिक्त एक मजला आणि चार नवीन कोर्ट हॉलच्या बांधकामाचा यामध्ये समावेश आहे. आ. विजयसिंह पंडित यांनी निवडणुक जाहिरनाम्यामध्ये या कामाचे आश्वासन दिले होते. गेवराई न्यायालयीन इारतीच्या विस्तारीत बांधकामासाठी 10कोटी 2 लक्ष रुपयांचा निधी मंजुर केल्याबद्दल आ. विजयसिंह पंडित यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे जाहिर आभार व्यक्त केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या जाहिरनाम्यात आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई येथील न्यायालय इमारतीच्या विस्तारीत बांधकामासह गेवराई येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मतदारांना दिले होते. आ. विजयसिंह पंडित यांनी आश्वासन पूर्तीसाठी निवडून आल्यानंतर सातत्याने प्रयत्न केले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर गेवराई न्यायालय इमारतीच्या विस्तारीत बांधकामासाठी 10 कोटी 2 लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला असून गुरुवार, दि.19 जून रोजी विधी व न्याय विभागाने त्याच्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. अस्तित्वातील न्यायालयीन इमारतीवर अतिरिक्त एक मजला आणि चार कोर्ट हॉल यासह इलेक्ट्रिफिकेशन, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, एअर कंडीशन, फर्निचर, लिफ्ट आदी कामांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
गेवराई न्यायालय इमारतीच्या विस्तारीत बांधकामासाठी निधी मंजुर केल्याबद्दल आ. विजयसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे जाहिर आभार व्यक्त केले आहे. विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी दि.19 मे रोजी ना. अजितदादा पवार गेवराई शहरात आले असताना गेवराई न्यायालयातील वकिल संघाच्यावतीने त्यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले होते. या कार्यक्रमात ना. अजितदादा पवार यांनी या कामाच्या मंजुरीचा शब्द गेवराईकरांना दिला होता. दादांचा पक्का वादा महिनाभरात पूर्ण झाल्याचा अनुभव यानिमित्ताने गेवराईकरांना आला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गेवराई न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्याचा मार्ग सुकर होणार असल्याची माहिती यानिमित्ताने आ. विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. गेवराई न्यायालयाच्या वकिल संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी आ. विजयसिंह पंडित यांचे या कामाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...