विज वितरणच्या लक्की डिजिटल योजने अंतर्गत गेवराईच्या पाच ग्राहकांंना स्मार्ट फोन वितरीत
गेवराई दि 28 ( वार्ताहार ) विज वितरण कंपनी कडून नियमीत विज भरणा करणाऱ्या पाच लक्की ग्राहकांना स्मार्टफोन देण्यात आले आहेत तसेच विज वितरण च्या मुख्य कार्यलय मुबंई याठिकाणी लक्की ड्रॉ करण्यात आला होता तसेच यामध्ये गेवराई तालुक्यातील पाच नियमीत विज बील भरणा करणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोन बक्षीस देण्यात आला असून यांचे वितरण गेवराईचे कार्यकारी उप अभियंता एस एम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,महावितरण कंपनी महाराष्ट्र राज्य यांनी गेल्या तिन महिण्यापुर्वी नियमीत बील भरणा करणाऱ्या ग्राहकांना डिजिटल लक्की या योजने अंतर्गत स्मार्टफोन तसेच स्मार्टवॉच अशी बक्षीसे ठेवण्यात आली होती तसेच गेल्या सहा महिण्यापासून विज बिल न थकवता अश्या ग्राहकांना या योजनेत समाविष्ठ करण्यात आले होते तसेच याचा लक्की ड्रॉ विजवितरण मुंबईच्या कार्यलयात झाला तसेच गेवराई तालुक्यातील विष्णू काशिनाथ गूंजाळ रा धोंडराई,प्रज्ञेश प्रभाकरराव पराठ रा गेवराई,अमोल बाबूराव वाकडे रा धोंडराई,अनिलकूमार अमृतसिंग कुशवा रा गेवराई,एस के बशीर गफूर रा उमापूर या पाच लक्की ग्राहकांना स्मार्टफोनचे वितरण गेवराई महावितरण कार्यलयात करण्यात आले यावेळी कार्यकारी उप अभियंताएस एम मोरे,संपादक अविनाश इंगावले, सा ले ए आर वाघमोडे,जक्कल, हितनाळीकर,प्रधान,काशिद यांची उपस्थिती होती.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...