अमरसिंह पंडित यांनी धोक्कादायक डिपीचा प्रश्न सोडवला भीमनगर येथील नागरिकांनी मानले आभार
दि.19 ( वार्ताहार ) गेवराई शहरातील भीमनगर येथे रस्त्याला लागून असणारी विद्युत मंडळाची डीपी धोकादायक ठरली होती. नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी विशेष लक्ष घालून ही डीपी हाटवल्यामुळे निर्माण झालेला धोका टाळला असून भीम नगर येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेवराई येथील भीमनगर भागा मधील स्मशानभूमी कडे जाना-या आणि कायम वर्दळ असना-या रोडच्या बाजूला लागुनच भर वस्तीमध्ये असणारी ही डीपी अंत्यंत धोके दायक बनली होती .रस्त्याने जाणारी वाहने टू व्हीलर तसेच लहान मुले भटकनारी जनावरे नागरिक यांना या डीपीचा धोका निर्माण झाला होत. रात्री अपरात्री किंवा कोणत्याही वेळेला डीपीवर पार्किंग होऊन जाळाचे लोळ पडत होते, स्पार्किंग होऊन स्फोट होत होते. धोकेदायक प्रसंग सतत वारंवार घडत असल्यामुळे या डीपी जवळ राहणारे नागरिक भयभीत झाले होते. ही डीपी हटवण्यासाठी महावितरण कंपनीकडे गेली दहा-बारा वर्षांपासून या भागातील स्थानिक लोकांनी व अनेक लोकप्रतिनिधीनी या डीपीचा पाठपुरावा केला परंतु त्यांनाही डीपी घालवण्यासाठी यश आले नाही, शेवटी नागरिकांनी युवानेते पृथ्वीराज पंडित यांच्या नेतृत्वाखाली जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित व आ. विजयसिंह पंडित यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. अमरसिंह पंडित यांनी येथील परिस्थितीचे गांभीर्य पाहून हा प्रश्न हाती घेतला व पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे ही डीपी शेवटी हालवण्यात आली. त्यामुळे गेली अनेक वर्षापासून जिव मुठीत घेऊन राहणा-या लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
धोकादायक डीपी हालवण्यासाठी भीमनगर येथील जमीर शेख,फय्युम शेख, राहुल सोनकांबळे, माझेद यांच्यासह नागरिकांनी याबाबत पाठपुरावा केला असून त्यांनी व डीपीचा प्रश्न सोडवल्याबद्द जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित आ.विजयसिंह पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित आणि शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांचे आभार मानले आहेत.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...