January 22, 2025

अवैध वाळू तस्करीला जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका

अनेक तस्करांना 14 कोटीच्या  दंडाच्या नोटीसा

गेवराई दि 8 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील अवैध वाळू तस्करी याला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ब्रेक लावण्यास सुरूवात केली आहे चार जणांचे निलंबन त्यानंतर वासनवाडीच्या एका माफियाला 7 कोटी दंडाची नोटीस बजावल्या नंतर आता पुन्हा जिल्हाधिकारी यांनी काही जणांना तब्बल 14 कोटीच्या दंडाच्या नोटीस पाठवल्या असल्यामुळे वाळू माफियात खळबळ माजली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात अवैध वाळू तस्करी हा विषय गेल्या अनेक वर्षापासासून चर्चेत आहे तसेच याठिकाणी हा खूप अपघात तसेच कायदा व सुव्यस्थेला बाधा आनण्याच्या घटना याला दिवसादिवस वाढ होत चालली असतांना या प्रकरणात बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जातिने व गांभिर्यपुर्वक लक्ष केंद्रित केले आहे तसेच गत दोन दिवसापुर्वीच चार महसूल कर्मचारी यांचे निलंबन तसेच वासनवाडीच्या एकाला 7 कोटीची दंडाची नोटीस बजावण्यात आल्यानंतर आज बुधवारी त्यांनी समीर बाबुलाल शेख रा आहेर वाहेगाव याने दीड महिन्यात 105 ट्रिप वाळू उपसा केला त्याला तीन कोटी दहा लाख 49 हजार रुपये दंड केला आहे. तर रिजवान बशीर शेख रा हिरापूर याने दीड महिन्यात 192 ट्रिप केल्याने पाच कोटी, 36 लाख 27 हजार, ईश्वर शिवनाथ सुखदेव रा म्हाळस पिंपळगाव याने 39 ट्रिप केल्याने 1 कोटी 39 लाख दंड,गजानन भारत मुगूटराव रा बाग पिंपळगाव याने 92 ट्रिप केल्याने दोन कोटी 76 लाख तसेच अब्दुल बशीर अब्दुल सत्तर रा मोमीनपुरा याने 66 ट्रिप केल्या, त्यामुळे या मालकाला दोन कोटी नऊ लाख रुपये दंड केला आहे. तसेच जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या जिगरबाज कार्यवाईमुळे वाळू माफियाचे धाबे दणानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *