वाळू माफियांची कुडंली प्रशासनाच्या हाती;वासनवाडीच्या गोकूळला सात कोंटीची नोटीस
महसूल विभागाने वाळू माफियांची कुडंली काढली;सिसीटीव्हीतून धक्कादायक वास्तव समोर
गेवराई दि 7 ( वार्ताहार ) काल वाळू उपस्याबाबद कर्तव्यात कूसूर केल्या प्रकरणी चार जणांविरूद्ध निलंबनाची कार्यवाई जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केल्यानंतर बीड गौणखणिज विभागाचे एक पथक दिवसभर गोदापात्रात फिरत होते तसेच पाडळशिंगीच्या टोल नाक्यावर एक पथक पाच तास तळ ठोकून होते तसेच गेल्या एक वर्षापासूनचा सिसीटीव्ही फूटेजचा डाटा महसूल विभागाने प्राप्त केला आहे यामध्ये भिषण वास्तव समोर आले आहे एकाच हायवाने तब्बल एक वर्षात 679 वेळा वाहतूक केली आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरूण वासनवाडी येथील गोकूळ गायवाड याला 7 कोटी 36 लाखं रूपयांची दंडाची नोटीस बजावण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुका वाळू तस्करी चे केंद्रबिंदू बनले आहे गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपसा करून त्यांची स्वत;च्या अर्थिक फायद्यासाठी तस्करी केली जाते याला प्रशासनातले बडे अधिकारी आणि पुढारी यांचे निकटवर्तीय यांच्या संगणमताने ही संपुर्ण प्रक्रीया राबवली जात होती ऐवढचं नाही तर गेवराईचा पदभार मिळावा म्हणून काही लोकतर चक्क मुंबईवरून गेवराईला आले ही बाब पोलिस अधिक्षक यांनी देखील लक्षात घ्यावी पोलिसांचा अवैध वाळू तस्करीशी कसलाही संबंध नसताना चोरीचा उद्देश म्हणून पोलिस यात हस्तक्षेप करतात ही शोकांतिका आहे तसेच गौणखणिज हा विषय महसूलचा आहे पण काही बेशीस्त पोलिस अधिकाऱ्यामुळे गेवराई तालुक्याची कायदा व सुव्यैस्था याला गालबोट लागले आहे हे वास्तव आहे काल रात्री पासून दादागिरी,दहशत याचां प्रत्यक्ष अनूभव जिल्हाधिकारी यांनी घेतला त्यानंतर गेवराई तालुक्यातील फोफावलेली वाळू तस्करी ला लगाम घालण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे अनेकांची कुडंली महसूलने काढली आहे तसेच याठिकाणी धमक्या ठाणेदार यांची नेमणूक पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी करावी अशी मागणी होऊ लागली आहे तसेच जिल्हाधिकारी अनेक किती माफियांना रेकॉर्डवर घेऊन कार्यवाई करतात हे तर येणारा काळच ठरवेल तसेच या कार्यवाईमुळे अनेकांचे धाबे दणानले आहेत.