
कै.केशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप
गेवराई: दि 3 ( वार्ताहार )
ज्ञानेश जनकल्याण सेवाभावी संस्था बीड संचलीत कै.केशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालय, तलवाडा येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांसह खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय घोडके तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक बळीराम बारवकर सह पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सर्वप्रथम दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. यावेळी शाळेचे शिक्षक विजय जाधव, लहुराव ढोबळे, संदिप सरवदे, छाया शिंदे, सुनंदा भोसले, संगिता जाधव, आनंद दळवी, अशोक हावळे, दिपक काळे यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पांडव यांनी तर आभारप्रदर्शन योगीराज काळे यांनी व्यक्त केले.