April 19, 2025

पोलिस अधीक्षकांचा गून्हेगार यांच्यावर वॉच;मोठ्या कार्यवाईच्या हालचाली

वाळूच्या प्रकरणातील अनेक आरोपी व कर्मचारी यांची कुंडली मागविली?

गेवराई दि 3 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात वाळूच्या संदर्भात दाखल असलेल्या गून्ह्यात काय?प्रगती आहे किंवा काय?कायदेशीर कडक कार्यवाई केली त्या अंनूषगाने पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी आता मोठ्या कार्यवाईच्या दृष्टीकोणातून हालचाली वाढविल्या असल्याची माहिती असून पोलिस अधीक्षक यांचे वाळू संदर्भातील आरोपी यांच्यावर करडी नजर आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी राज्य शासनाने आय पी एस नवनित कॉवत यांच्यावर सोपविली आहे ते अतिषय शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे तसेच बीड चा पदभार स्विकारल्या पासून बीड पोलिस दल कार्यवाईच्या उद्देशाने कामाला लागले आहे तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतूकीसाठी कायम चर्चेत असतो प्रशासनातील अनेक बडे अधिकारी यांचा यात छूपा सहभाग असतो परंतू बीड पोलिस अधीक्षक पदाचा कारभार आय पी एस नवनित कॉवत यांनी घेतल्या पासून या ठिकाणी कार्यरत असनाऱ्या किंवा प्रत्यक्ष वाळूत सहभागी असनाऱ्या कर्मचारी अधिकारी यांची लिस्ट पोलिस अधीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याची चर्चा आहे तसेच गेवराई,तलवाडा,व चकलांबा या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाळूच्या गून्ह्यात तपासी अधिकारी यांनी काय?कार्यवाई केली असे सगळे गून्ह्याची तपासणी होणार असल्याचे संकेत आहेत तसेच एकापेक्षा जास्त वाळूचे गून्हे दाखल असलेल्या आरोपीवर पोलिस अधीक्षक यांची करडी नजर आहे अश्या आरोपी विरूद्ध कठोर व कडक कायदेशीर कार्यवाईच्या हालचाली पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी सुरू केल्या आहेत तसेच गेवराई तालुक्यातील अनेक कर्मचारी व अधिकारी पोलिस अधीक्षक यांच्या रडारवर आहेत अशी देखील माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *