अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्याच्या हालचाली सुरू
महसूल जिल्हा प्रशासनाच्या वतिने आठ जणांना नोटीसा
गेवराई दि 29 ( वार्ताहार ) वाढती गून्हेगारी लक्षात घेता तसेच भविष्यात कायदा व सुवैस्था याला कूठेही गालबोट लागणार नाही या दृष्टीकोणातून बीड जिल्हा महसूल प्रशासनाने देखील कार्यवाईचा फास आवळला असल्याची माहिती असून गेवराई तालुक्यात आठ जणांकडे अधीकृत शस्त्र परवाने आहेत यांना पोलिस यंत्रनेमार्फत नोटीसा बजावणयात आल्या असून 48 तासांत लेखी कायदेशीर खूलासा सादर न केल्यास परवाना रद्द करण्यात येईल अश्या प्रकारच्या नोटीस बजावल्या आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड जिल्हाची कायदा व सुवैस्था ही बिघडली होती महसूल प्रशासन असो किंवा पोलिस दल असो वाढती गून्हेगारी तसेच याला प्रशासनातील बडे अधिकारी यांचा छूपा पाठिंबा होता ही बाब अनेकदा उघडकीस आली आहे तसेच सक्षम कार्यवाई न झाल्यामुळे तसेच राजकीय शक्तीपुढे प्रशासन कार्यवाईला सामोरे जात नव्हते परंतू बीड महसूल प्रशासनाच्या वतिने गून्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने आता पाऊले उचलली जाऊ लागली आहेत गेवराई तालुक्यातील आठ लोकांकडे कायदेशीर शस्त्र परवाने आहेत यांच्या विरूद्ध अनेक गंभीर स्वरूपाची गून्हे दाखल आहेत अश्या व्यक्ती विरोधात जिल्हा महसूल प्रशासन त्यांचा परवाने रद्द करनार आहेत यामुळे पोलिस ठाण्या मार्फत यांना 48 तासांत लेखी खूलासा सादर न केल्यास असे शस्त्र परवाने रद्द करण्याच्या हालचाली जिल्हा महसूल प्रशासनाकडून सुरू झाल्या असून अप्पर जिल्हाधिकारी शिवकूमार स्वामी यांनी ह्या नोटीसा पोलिस ठाणे मार्फत बजावल्या आहेत तसेच या कार्यवाईमुळे शस्त्र परवाना धारक यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे.