April 19, 2025

संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी बदामराव पंडित यांची भेट घेऊन शिवसैनिकांशी साधला संवाद 

गेवराई दि 3 ( वार्ताहार )  जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख योग्य निर्णय घेतील अशी साद घालून शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी माजी मंत्री बदामराव पंडित यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हटले आहे. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
बीड जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच बीड जिल्हाप्रमुख पद स्थगित ठेवल्यानंतर, पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी आवर्जून गेवराई येथे येऊन, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडीत यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी माजी सभापती पंढरीनाथ लगड, युवानेते रोहित पंडित, युवानेते यशराज पंडित, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळासाहेब अंबुरे, नितीन धांडे, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख भाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. आनंदराव जाधव यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हटले की, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे राज्यातील व जिल्ह्यातील लोक शिवसेनेकडे मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने पाहत आहेत. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील शिवसेना व शिवसैनिकांच्या बळकटीकरणासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे योग्य निर्णय घेतील.  चिंता करू नका असे सांगून आनंदराव जाधव यांनी युधाजित पंडित यांच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या शिवसैनिकांच्या मागणीला एक प्रकारे आपला पाठिंबा असल्याचे संकेत दिले. त्यामुळे उपस्थित शिवसैनिकांनी युधाजित पंडित यांचा विजय असो, हा आवाज कोणाचा.. शिवसेनेचा, अशा घोषणा देऊन आनंदराव जाधव यांना प्रतिसाद दिला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, बबलू खराडे, माजी उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, तालुकाप्रमुख कालिदास नवले, तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, शहर प्रमुख शिनुभाऊ बेदरे, तालुका संघटक गणेश चव्हाण, किसान सेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ, प स सदस्य महादेव औटी, गणेश लाड, पप्पू कोठेकर, विलास शिंदे, धनेश्वर खेत्रे, भागवत वडघणे, शेख सादेक, मुकुंद बाबर, मुक्ताराम आव्हाड, बदाम पौळ, सोशल मीडियाचे अशोक नाईकनवरे, शेख नवीद, सौरभ काळे, राजू नाडे, शेख शहेदाद, दादासाहेब खराद, दत्ता खराद, सुरज शिनगारे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *