January 22, 2025

कितीही राजकीय शक्त्या ऐकवटल्या तरी विजयसिंह पंडित यांचा विजय रोखू शकत नाही – सरवर पठाण

गेवराई दि 11 ( वार्ताहार ) गेल्या पाच वर्षात गेवराई मतदार संघातील जनतेनं किती नरक यातना भोगल्या आहेत तसेच विद्यमान आ लक्ष्मण पवार हे निष्क्रीय आमदार म्हणून त्यांची ओळख आहे तसेच मुस्लीम समाजाला टार्गेट करूण किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा डाव त्यांचा असून या अमिशाला व या फतव्याला मुस्मीम समाज थारा देणार नाही व येत्या निवडणूकीत शिवछत्र परिवारासोबत मुस्लीम समाज मोठ्या ताकतीने उभा व अश्या कितीही राजकीय शक्त्या एकवटल्या तरी विजयसिंह पंडित यांचा विजय रोखू शकत नाहीत असे प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सरवर पठाण यांनी दिले आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की गेल्या काही दिवसापुर्वी मुस्लीम समाजाचा भावना दूख;वल्या होत्या यावेळी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून मा आ अमरसिंह पंडित यांनी आपण मुस्लीम समाजा सोबत आहेत अशी भूमिका घेतली होती याला साक्षीदार मुस्मीम समाज आहे तसेच विद्यमान आ लक्ष्मण पवार हे त्यावेळी कुठे गेले होते?आगामी लोकसभेत त्यांनी काय?केलं हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी आता मुस्लीम समाजा विषयी पुळका दाखवणे बंद करावा तसेच समाजातील काही तरूण व त्यांची दिशाभूल करूण व त्यांना चमच्या सारखे जेवन झाल्यानंतर फेकून देऊ अशी भावना त्यांची असून माझी गेवराई मतदार संघातील तमाम मुस्लीम बांधवाना व माताभगींना,तरूणानां अवाहन आहे कूठल्याही फतव्याला बळी पडू नका हा शिवछत्र परिवार सदैव्य मुस्लीम समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.येत्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून विजयसिंह पंडित यांना आमदार करा असेही त्यांनी शेवटी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *