April 19, 2025

पवारांच्या राजकीय बूरूजाला अमरसिंह पंडितांचा हादरा

माजी नगर अध्यक्ष विनोद सौंदरमल राष्ट्रवादीत दाखल

 

गेवराई दि 9 ( वार्ताहार ) गेवराई विधानसभा निवडणूकीच्या रणधूमाळीत गेवराई मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधीकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांना मतदाराचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच आ लक्ष्मण पवार यांचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते समर्थक हे मा आ अमरसिंह पंडित यांच्या गळाला लागले असून आज त्यांची प्रचिती गेवराई शहराने पाहिली असून पवारांचा राजकीय गड आ अमरसिंह पंडित यांनी हादरून टाकला असून आ लक्ष्मण पवार यांचे विश्वासू सहकारी माजी नगर अध्यक्ष विनोद सौंदरमल यांनी मा आ अमरसिंह पंडित यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून शक्ती प्रदर्शन करत प्रवेश केला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,शिवछत्र परिवारसा सोबत घेऊन मा आ अमरसिंह पंडित यांचे कनिष्ठ बंधू मा जिप अध्यक्ष विजयसिंह पंडित हे महायुती कडून गेवराई विधानसभा निवडणूकीला सामोरे जात आहेत तसेच त्यांच्या विजयासाठी मा आ अमरसिंह पंडित यांनी तगडी फिल्डिंग लावली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तसेच गेवराई तालुक्याच्या राजकारणात चाणक्य म्हणून मा आ अमरसिंह पंडित यांचा नामलेख केला जातो तसेच गेल्या चाळीस वर्षासून गेवराईच्या पवार परिवारातील सहकारी म्हणून पाहिले जाणारे गेवराई शहराचे मा नगरअध्यक्ष विनोद सौंदरमल यांना गेवराई शहरासह तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे त्यांच्या प्रवेशाने राजकीय गणिताची जूळवणी ही शिवछत्र परिवार तसेच विधानसभेचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना फायद्याची ठरू शकते असे म्हटले देखील वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *