January 22, 2025

गेवराई मतदार संघाचे विद्यमान आ लक्ष्मण पवार आज करणार पक्ष प्रवेश?

गेवराई मतदार संघात नविन समिकरण

गेवराई दि 20 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्याचे भाजपाचे विद्यमान आ लक्ष्मण पवार हे आज? मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटात दाखल होण्याची संकेत आहेत तसेच असे झाल्यास हा राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना मोठा धक्का मानला जाईल.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या अनेक दिवसापासुन गेवराई मतदार संघाचे विद्यमान आ लक्ष्मण पवार हे पक्षश्रेष्ठीवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या तसेच पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर ते नाराज असल्याचे त्यांनी सांगितले होते तसेच पुढे काय?निर्णय घेतील हे चित्र अद्याप पर्यंत स्पष्ट नव्हते परंतू आज ( दि 19 ऑक्टोंबर ) रोजी?ते खा शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश?करणार असल्याची माहिती असून ही सगळी प्रक्रीया राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राबवली असल्याची माहिती आहे असे घडल्यास हा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना मोठा धक्का मानला जाईल.तसेच या मतदार संघात नविन समिकरण पहावयास मिळेल.व गेवराई मतदार संघातून तूतारी या चिन्हाकडून ते आगामी निवडणूकीला समोरे जातील असे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *