गेवराईतील ठराविक पोलिस कर्मचारी यांनी पोलिस दलाची अब्रू वेशीला टांगली

दारू पिऊन पाच लोकांना गंभीर करणाऱ्या तिन पोलिस कर्मचारी यांच्यावर पोलिस अधीक्षक गून्हा दाखल करणार का?

गेवराई दि 8 ( वार्ताहार ) गेल्या तिन दिवसांपुर्वी बीड जालना रोडव सायंकाळी सात वाजण्या दरम्यान एका इंडिका कारने तिन मोटार सायकल यांना जोराची धडक दिली यामध्ये तिन किरकोळ व दोन जण गंभीर जखमी झाले होते तसेच दोघांवर छ संभाजी नगर याठिकाणी उपचार सुरू आहेत तसेच ज्या इंडिका कारने हा अपघात झाला ती कार गेवराई पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांची होती तसेच या कारमध्ये गेवराई पोलिस ठाण्याचे दोन आणि ट्राफिक चा एक कर्मचारी होता तसेच यांच्यावर अद्याप पर्यंत गून्हा दाखल झालेला नाही ही शोकांतिका आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, एम 23 वाय 1775 ही इंडिका कार गेवराई येथील पोलिस कर्मचारी यांची आहे तो सुट्टीवर होता त्यांच्या सोबत आणखी दोन पोलिस कर्मचारी होते ते मध्यपान करून कार भरगाव वेगात चालवत असतांना बीड जालना रोडवर ( दि 5 आक्टोबर ) रोजी सायकांळी सातच्या सुमाराम या इंडिका कारने तिन मोटार सायकल स्वार यांना जोराची धडक दिली व पाच लोकांना गंभीर जखमी केले तसेच घटनास्तळावरून या तिनही पोलिस कर्मचारी यांनी पलायन केले रस्त्यावर नागरिक जमा झाले तसेच गेवराई पोलिस ठाण्याचा पोपटपंच्ची साहय्यक पोलिस निरीक्षक व एक कर्मचारी यांने त्या ठिकाणी जमाव झालेल्या लोकांना दादागिरी केली तसेच या कारमध्ये असलेले पोलिस कर्मचारी यांचे आयडी कार्ड व दारूच्या बाटल्या फेकून दिल्या बीड जिल्ह्यातील सर्वच पोलिस कर्मचारी यांच्यावर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी वचक बसवला आहे परंतू गेवराई पोलिस ठाण्याचे काही ठराविक पोलिस कर्मचारी पोलिस अधीक्षक यांना जूमानत नाहीत हे या घटनेवरून सिद्ध होत आहे तसेच या प्रकरणाने बीड पोलिस दलाच्या नावाला गालबोट लागले असून पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून या तिन पोलिस कर्मचारी यांच्या विरूद्ध गून्हा दाखल करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *