वकील संघाच्या अध्यक्षपदी अमित मुळे चौथ्यांंदा विजयी
उपाध्यक्ष पदी सोमेश्वर कारके व सचिव प्रदिप मडके यांची निवड
गेवराई दि 30 ( वार्ताहार ) गेवराई वकील संघाची निवडणूक प्रक्रीया आज (दि 30 सप्टेंबर ) रोजी पार पडली तसेच सकाळी दहा वाजता निवडणूकीसाठी मतदानाला सुरूवात झाली 215 पैकी 203 विधिज्ञ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच विधिज्ञ अमित मुळे हे चौथ्यांदा या निवडणूकीत विजयी झाले आहेत तसेच विधिज्ञ सोमेश्वर कारके हे उपाध्यक्ष पदासाठी विजयी झाले तसेच विधिज्ञ प्रदिप मडके हे सचिव पदावर त्यांनी बाजी मारली आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई न्यायालयात दरवर्षी वकील संघाची निवडणूक घेतली जाते तसेच जेष्ठ विधिज्ञ एस डी सानप या निवडणूकीचे निवडणूक अधिकारी होते तसेच आज सकाळी दहा वाजता या वकील संघाच्या मतदानाला सुरूवात झाली तसेच या निवडणूकीत अध्यक्ष पदासाठी विधिज्ञ अमित मुळे व विधिज्ञ रविंद्र एल गवारे यांच्यात अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली तसेच विधिज्ञ अमित मुळे यांचा 45 मतांनी विजय झाला आहे तसेच विधिज्ञ सोमेश्वर कारके व विधिज्ञ पी पी जरांगे यांच्यात उपाध्यक्ष पदासाठी लढत झाली यामध्ये विविज्ञ सोमेश्वर कारके हे 4 मतांनी विजयी झाले आहेत तसेच सचिव पदासाठी विधिज्ञ प्रदिप मडके व विधिज्ञ आर एच राठोड यांच्यात लढत झाली तसेच यामध्ये विधिज्ञ प्रदिप मडके यांचा 2 मतांनी विजय झाला आहे तसेच संपुर्ण निवड प्रक्रीया ही जेष्ठ विधिज्ञ एस डी सानप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी पार पाडली तसेच दूपारी तिन वाजता या पदाची मतांची मोजणी करूण घोषणा करण्यात आली तसेच विधिज्ञ अमित मुळे यांनी चौथ्यांदा या निवडणूकीमध्ये ते अध्यक्ष झाले असल्याने नुतन पदअधिकारी यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...